PM Narendra Modi birthday: नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 17, 2019 | 15:15 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

PM Narendra Modi birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जाणून घ्या सर्व अपडेट्स...

PM Narendra Modi celebrates 69th birthday
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ६९वा वाढदिवस   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ६९वा वाढदिवस
 • पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
 • मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस आहे. मोदींच्या जन्मदिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये असून आज तेथे विविध कार्यक्रमात ते सहभागी झाले. वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली आई हिराबेन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच मोदींनी यावेळी आपल्या आईसोबत भोजनही केलं. त्यासोबतच नर्मदा नदीवर पूजा, आरती करतील, नमामी नर्मदा महोत्सवात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी गरुडेश्वर मंदिराला भेट दिली तर केवडिया येथे एका सभेला संबोधित केलं.

 1. नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद 
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आईची भेट, मोदींनी आईसोबत केलं भोजन 
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदींची केवडिया येथे जाहीर सभा
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नर्मदा नदीची केली पूजा 
 5. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा 
 6. नरेंद्र मोदींकडून सरदार सरोवरची पाहणी, नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी सरदार सरोवरात तिरंगी रोषणाई
 7. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जंगल सफारी 
 8. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवडिया येथे कॅक्टस गार्डनचा दौरा केला. मोदींसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि राज्यपाल आचार्य देवव्रत सुद्धा उपस्थित 
 9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे खलवानी इको-टूरिझम साइटचा दौरा केला 
 10. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ६९ किलो वजनाचा केक कापला 
 11. मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाराणसी येथे मोदींच्या एका चाहत्याने संकटमोचन मंदिरात हनुमानाला सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. अरविंद सिंह यांनी सांगितले की, "लोकसभा निवडणुकीपूर्वी मी संकल्प केला होता की जर मोदींनी दुसऱ्यांदा सरकार बनवलं तर मी हनुमानजींना १.२५ किलो वजनी सोन्याचा मुकुट अर्पण करेल".
 12. मोदींच्या दौऱ्यासाठी नर्मदानदीवरील केवडिया धरणावरील कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु 
 13. गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करुन मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
 14. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी