Russia- Ukraine War : थेट पुतीनशी बोलून नरेंद्र मोदी संपवू शकतात युद्ध; मध्यस्थीसाठी युक्रेनकडून आवाहन

शिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्ध (War) सुरू होऊन महिना उलटलाय, परंतु अजूनही युक्रेनमध्ये गोळीबार चालू आहे. या दरम्यान दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडूनही युद्ध थांबलेलं नाही. याच दरम्यान युक्रेन याविषयी मोठं विधान केलं आहे. 'आम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही' असं म्हणत युक्रेनचे अध्यक्ष (President of Ukraine) वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) म्हणाले आहेत.

Narendra Modi can end war by talking directly to Putin
थेट पुतीनशी बोलून नरेंद्र मोदी संपवू शकतात युद्ध, पण..   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रशिया युक्रेन युद्ध दुसऱ्या महिन्यातही सुरूच
  • युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांचं भारताला आवाहन
  • युक्रेन हा नेहमीच भारताच्या अन्नसुरक्षेचा एक हमीदार देश राहिला आहे.

कीव्ह : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्ध (War) सुरू होऊन महिना उलटलाय, परंतु अजूनही युक्रेनमध्ये गोळीबार चालू आहे. या दरम्यान दोन्ही देशांत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडूनही युद्ध थांबलेलं नाही. याच दरम्यान युक्रेन याविषयी मोठं विधान केलं आहे. 'आम्ही कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही' असं म्हणत युक्रेनचे अध्यक्ष (President of Ukraine) वोलोदिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) म्हणाले आहेत. परंतु युक्रेनचा भारतावर अजून विश्वास असून पंतप्रधान मोदी जर मध्यस्थी करतील युद्ध थांबेल असं मत युक्रेनेचे परराष्ट्र मंत्री (Foreign Minister) दिमित्रो कुलेबा (Dmytro Kuleba) यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना मांडलं आहे. भारताचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मध्यस्थता करावी अशी मागणी त्यांनी परत एकदा केली आहे.

भारताच्या अन्नसुरक्षेसाठी युक्रेन हमीदार देश

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी 'एनडीटीव्ही'शी संवाद साधताना मोदींना मध्यस्थतेसाठी आवाहन केले आहे. रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान भारत समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे, हे खरं आहे (भारतानं संयुक्त राष्ट्रात मतदानापासून लांब राहण्याची भूमिका घेतली होती) युक्रेन हा नेहमीच भारताच्या अन्नसुरक्षेचा एक हमीदार देश राहिला आहे. आम्ही अनेक उत्पादनं पुरवतो. हे परस्पररित्या लाभदायक संबंध आहेत, असं दिमित्रो यावेळी म्हणालेत.

Read Also : पेट्रोल - डिझेल पाठोपाठ टोल टॅक्सही वाढणार

'मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर...'

'जगात एकच व्यक्ती आहे ज्याला हे युद्ध हवंय आणि ती व्यक्ती म्हणजे व्लादिमीर पुतीन... हे युद्ध थांबवण्यासाठी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर आम्ही त्यांच्याविरोधात का असावं? रशियानं युक्रेनमध्ये रणगाडे आणि लढावू विमानांसहीत प्रवेश करेपर्यंत युक्रेन हे अनेक भारतीयांसाठीही घर राहिलंय. या विद्यार्थ्यांनी परत यावं, अशी आमची इच्छा आहे' रशियात राष्ट्राध्यक्ष पुतीन हे निर्णय घेणारे एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे हे युद्ध कसं संपवायचं, याबद्दल मोदींनी त्यांच्याशी थेट बोलणं आवश्यक आहे, अशी गरजही त्यांनी व्यक्त केली.

Read Also : तुमच्या गृहकर्जावर 1 एप्रिलपासून नाही मिळणार 'हा' कराचा लाभ

सैन्य माघारी घेण्याच्या भूमिकेवर संशय

युक्रेननं युद्ध थांबवण्यासाठी अनेक पर्याय रशियासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु जमिनीवर स्थिती पाहण्याची आवश्यकता आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. कीव्ह आणि चेर्नेगिव्ह शहरातून रशियाच्या घोषणेनंतरही लष्कर माघारी फिरलेलं नाही. काही शहरांतून रशियन लष्कर परत जाताना दिसत असलं तरी त्याचा अर्थ संपूर्ण सेना परत जातेय, असा नाही. त्यामुळे आम्ही रशियन आश्वासनांवर सावध भूमिकेत आहोत. खोट्या आश्वासनांतून दिशाभूल करून पूर्व भागात हल्ले घडवून आणण्याचा रशियाकडून खेळी खेळली जात असल्याची शक्यताही कुलेबा यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी