LPG Subsidy : LPG सबसिडी बंद केल्याने सरकारी तिजोरीत हजारो कोटी रुपये, एका वर्षात सिलिंडरच्या किंमती एक हजार रुपयांच्या वर

घरगुती वापरासाठी एलपीजी गॅसवरील अनुदान केंद्र सरकार हळू हळू बंद करत आहे. हे अनुदान बंद केल्याने सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२०-२१ साली केंद्र सरकारने एलपीजी अनुदानात ११ हजार ८९६ कोटी रुपये खर्च केले होते. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्यात घट होऊन केंद्र सकारने अनुदानाच्या माध्यमातून फक्त २४२ कोटी रुपये खर्च केले होते.

LPG Gas subsidy
एलपीजी गॅस अनुदान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • घरगुती वापरासाठी एलपीजी गॅसवरील अनुदान केंद्र सरकार हळू हळू बंद करत आहे.
  • हे अनुदान बंद केल्याने सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत.
  • २०२०-२१ साली केंद्र सरकारने एलपीजी अनुदानात ११ हजार ८९६ कोटी रुपये खर्च केले होते.

LPG Subsidy : नवी दिल्ली : घरगुती वापरासाठी एलपीजी गॅसवरील (Domestic use LPG Cylinder) अनुदान (subsidy) केंद्र सरकार (Central Government) हळू हळू बंद करत आहे. हे अनुदान बंद केल्याने सरकारच्या तिजोरीत हजारो कोटी रुपये जमा झाले आहेत. २०२०-२१ साली केंद्र सरकारने एलपीजी अनुदानात ११ हजार ८९६ कोटी रुपये खर्च केले होते. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात त्यात घट होऊन केंद्र सकारने अनुदानाच्या माध्यमातून फक्त २४२ कोटी रुपये खर्च केले होते. अशा प्रकारे अनुदान बंद करून केंद्र सरकारने एका आर्थिक वर्षात ११ हजार ६५४ कोटी रुपये वाचवले आहेत.

अधिक वाचा :  Covid Update: कोरोना पुन्हा घाबरावयला लागला! एका दिवसात इतके रुग्ण, ॲक्टिव केसेचा ग्राफ दीड लाखांच्या पुढे गेला

पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१७ ते १८ मध्ये एलपीजी सबसिडीवर केंद्र सरकारने २३ हजार ४६४ कोटी रुपये खर्च केले होते. तर २१८-१९ या आर्थिक वर्षात सकारने ३७ हजार २०९ कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसामान्यांना सिलिंडरवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. तेव्हा मोठ्या संख्येने लोकांनी सबसिडी सोडून दिली होती. त्यामुळे अनुदानावर २४ हजार १७२ कोटी रुपये खर्च आला होता.

अधिक वाचा : Murder for Mango : चिमुकलीनं आंबा मागितल्याचा आला राग, सख्ख्या काकाने असा घेतला जीव

२०२० -२१ या वर्षात अनुदानावरील खर्च ५० टक्क्यांनी कमी झाला. या वर्षात केंद्र सरकारने अनुदानापोटी ११ हजार ८९६ कोटी रुपये खर्च केले. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने फक्त २४२ कोटी रुपये खर्च केले.  

अधिक वाचा : monkeypox : जगभरात मंकीपॉक्सचे १३ हजार रुग्ण, भारतात ३ मंकीपॉक्स रुग्ण

फक्त उज्वला योजनेसाठी अनुदान

जून २०२० मध्ये केंद्र सरकारने फक्त पंतप्रधान उज्वला योजनेसाठीच अनुदान मिळेल असे जाहीर केले. त्यामुळे अनुदान घेणार्‍या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. केंद्र सरकारने उज्वला योजने अंतर्गत वर्षाला १२ सिलिंडर्सना प्रति सिलिंडर २०० रुपयांचे अनुदान देण्यास सुरूवात केली. हे अनुदान लाभार्थ्यांचा बँक खात्यात जमा केले जातात.

अधिक वाचा : Arpita Mukharjee : कोण आहेत अर्पिता मुखर्जी? यांच्या घरी टाकलेल्या धाडीत ED ला मिळाले 20 कोटी

एका वर्षात २१८ रुपयांनी महागला सिलिंडर

२०२१ साली एका घरगुती सिलिंडरची किंमत ८३४.५० रुपये इतकी होती. आता या सिलिंडरची किंमत १०५३ रुपये इतकी झाली आहे. म्हणजेच एका वर्षात घरगुती सिलिंडरची किंमत २१८.५० रुपयांनी वाढली आहे. इतकेच नाही तर यावर मिळणारे अनुदानही केंद्र सरकारने बंद केले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी