पंतप्रधान नरेंद्र मोदीं आज वाराणसी दौरा, पाहा दिवसभराचा कार्यक्रम

लोकल ते ग्लोबल
Updated May 27, 2019 | 08:41 IST | टाइम्स नाऊ हिंदी

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मिळालेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२७ मे) आपल्या लोकसभा क्षेत्र असलेल्या वाराणसीचा दौरा करणार आहेत.

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी  |  फोटो सौजन्य: Twitter

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. त्यामुळे वाराणसीतील मतदारांचे आभार मानण्यासाठी वाराणसी येथे जाणार आहेत. यावेळी मोदी प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात पूजा ही करणार आहेत. वाराणसी येथे पोहोचल्यावर नरेंद्र मोदी पोलीस लाइनहून बांसफाटक पर्यंत जातील. यावेळी मोदींचा ताफा शहरातील विविध परिसरातून जाणार आहे.

भारतीय जनता पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी सकाळी काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील. शनिवारी मदोींनी ट्विट केलं होतं की, 'आईचे आशीर्वाद घेण्यासाठी रविवारी संध्याकाळी गुजरातला जाणार आहे. माझ्यावर पुन्हा: विश्वास ठेवल्याने परवा मी काशीतील महान भूमीवरील नागरिकांचे आभार मानण्यासाठी जाणार आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत येणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी सुद्धा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा असल्याने सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. सुरेंद्र सिंह यांनी पोलीस अधिक्षक आनंद कुलकर्णी यांच्यासोबत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. मोदींचा ताफा ज्या परिसरातून जाणार आहे त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. या परिसरात निमलष्करी दलाचे जवान आणि विशेष सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत मोदी ४.७९ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. या विजयानंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीचा दौरा करणार आहेत. यापूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३.७१ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.

यापूर्वी रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा दौरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे आपल्या घरी जाऊन आईचे आशीर्वाद घेतले. तसेच भाजप कार्यालयात जात तेथे एका सभेलाही संबोधित केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी