National Consumer day Significance and Theme 2022: आधुनिक काळात जगणारा ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा असतो. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक हा बाजारपेठेत होणा-य खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा केंद्रबिंदू बनला आहे.
भारतात दरवर्षी ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 24 डिसेंबर इ.स 1986 साली या ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.
या ग्राहक हक्क कायद्यानुसार आपल्याला खाली दिलेली हक्क व अधिकार दिले आहेत.
अधिक वाचा : मुलाखतीला जाताना कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे?
राष्ट्रीय ग्राहक दिन मराठी माहिती | Rashtriya Grahak Din
ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्काबाबत सक्षम व्हावा, याकरिता विविध ग्राहक संघटना लोकांना जागरूक करीत आहेत. या सर्वांसाठी 24 डिसेंबर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस 'जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून, राज्यघटनेने आपल्याला नागरिकत्वाचे हक्क दिले तसेच, ग्राहक म्हणूनही आपल्याला काही अधिकार देण्यात आले आहेत. त्यातील पहिला आणि सर्वात मोठा हक्क म्हणजे ग्राहकांना दिलेल्या किंमतीच्या समान वस्तू त्यांना मिळाली पाहिजे.
अधिक वाचा : पुण्यात आला तर या ठिकाणच्या पदार्थांची चव घ्याचं
वाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा आहेत. ग्राहकांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी ग्राहक संरक्षण कायदा बनविला गेला आहे. या कायद्यानुसार आता कोणताही ग्राहक अनुचित व्यापाराची तक्रार करू शकतो. यासाठी त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात व्यावसायिकांच्या व्यवहारात होणारी हेराफेरी लक्षात घेऊनच हा कायदा बनवला गेला आहे.
ग्राहक म्हणून तुम्ही काय करू शकता
Q.1) राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो ?
Ans. भारतात दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
Q.2) राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो ?
Ans. 24 डिसेंबर इ.स 1986 साली या ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो.