Importance of Kisan Diwas 2022 : शेती प्रधान भारतात दरवर्षी राष्ट्रीय किसान दिवस म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. 23 डिसेंबर रोजी हा शेतकरी दिवस साजरा केला जातो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीच्या दिवशी 'राष्ट्रीय शेतकरी दिवस' साजरा करण्यात येतो. चौधरी चरण सिंह यांनी आपल्या कार्यकाळात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सुद्धा घेतले होते. शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवशी म्हणजेच 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmers Day) साजरा करण्यात येतो. (Importance of Kisan Diwas 2022: National Farmer's Day 2022 Celebration Shetkari Diwas)
भारत सरकारने 2001 पासून चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय किसान दिवस म्हणजेच राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो.
हे पण वाचा : डोळा फडफडणे शुभ की अशुभ?, काय आहेत संकेत?
देश आणि शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण, यामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन आणि अद्ययावत शिक्षण घेऊन सक्षम बनवण्याची कल्पना येते. शेतकरी दिवसाच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या समारोहात त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तज्ज्ञ काम करतात.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सर छोटू राम यांचा वारसा चौधरी चरण सिंह यांनी पुढे नेल्याचं म्हटलं जातं. 23 डिसेंबर 1978 मध्ये त्यांनी किसान ट्रस्टची स्थापना केली. जेणेकरुन देशभरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील समस्यांबाबत जनजागृती करता येईल. राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रम, स्पर्धा, प्रदर्शन, लेखन स्पर्धा, शेतकऱ्यांच्या संबंधित शासकीय विभागांमध्ये आयोजित केल्या जातात.
हे पण वाचा : दररोज सकाळी करा या गोष्टी, दिवसभर मिळेल आनंदवार्ता
चौधरी चरण सिंह हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. चौधरी चरण सिंह हे शेतकरी कुटुंबातून होते. शेतकरु कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाणीव होती. चौधरी चरण सिंह हे देशातील असे शेतकरी नेता होते ज्यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला होता. जेव्हा शेतकऱ्यांची स्थिती सुधारेल तेव्हा देशाची प्रगती होईल असे त्यांचे म्हणणे होते.
23 डिसेंबर 1902 मध्ये जन्म झालेला चौधरी चरण सिंह हे देशाचे पंतप्रधान होते. मात्र, त्याचा कार्यकाळ हा जास्त मोठा नव्हता. 28 जुलै 1979 पासून ते 14 जानेवारी 1980 या काळात ते देशाचे पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भातील सुधारणांबाबतचे बिल सादर करत कृषी क्षेत्रात आपली भूमिका ठामपणे मांडली होती. चौधरी चरण सिंह यांचं 29 मे 1987 मध्ये निधन झालं.