National Voters Day, National Voter Day : 25 जानेवारी 2023, राष्ट्रीय मतदार दिवस; कसा साजरा करतात राष्ट्रीय मतदार दिवस

National Voters Day, National Voter Day, How to Celebrate National Voters Day, Theme For National Voters Day 2023 : भारतात 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतात.

National Voters Day
25 जानेवारी 2023, राष्ट्रीय मतदार दिवस  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 25 जानेवारी 2023, राष्ट्रीय मतदार दिवस
  • कसा साजरा करतात राष्ट्रीय मतदार दिवस
  • दाच्या मतदार दिनाची संकल्पना

National Voters Day, National Voter Day, How to Celebrate National Voters Day, Theme For National Voters Day 2023 : भारतात 2011 पासून दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतात. या निमित्ताने दरवर्षी मतदानासाठी जनजागृती करणे आणि मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदार याद्या अपडेट (अद्ययावत) करणे ही कामं केली जातात. नागरिकांना निडणुकीत मतदान करून हक्क बजावण्याचे आवाहन केले जाते. तसेच मतदानाचा हक्क बजावू अशा स्वरुपाची प्रतिज्ञा मतदारांकडून करून घेतली जाते. यंदा आज बुधवार 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस आहे. हा तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आहे. 

स्वतंत्र भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासूनच अठरा वर्षांच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क देण्यात आला. नोंदणी केलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करून त्याचा हक्क बजावण्याची तसेच राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी होण्याची संधी आहे. 

भारतात निःपक्षपाती पद्धतीने निवडणूक घेण्यासाठीच भारत निवडणूक आयोग या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली आणि भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक देश झाला. या घटनाक्रमांचे स्मरण करण्यासाठी तसेच मतदानासाठी जास्तीत जास्त नागरिकांना प्रेरणा देण्याकरिता राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतात.

‘मतदानासमान दुसरे काहीच नाही, मी नक्की मतदान करणार’ही यंदाच्या मतदार दिनाची संकल्पना आहे. ही संकल्पना मतदारांना समर्पित आहे. मतदानामुळे मिळालेल्या सामर्थ्याच्या माध्यमातून, निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याविषयी प्रत्येकाची भावना आणि आकांक्षा प्रतीत होते. निवडणूक प्रक्रियेचा उत्सव तसेच समावेशकता दर्शविण्याच्या उद्देशाने या दिनासाठी बोधचिन्ह तयार केले आहे. त्यामध्ये पार्श्वभूमीवरील अशोक चक्र जगातील सर्वात मोठ्या लोकशाही यंत्रणेचे प्रतिनिधित्व करते. शाई लावलेल्या बोटाची प्रतिमा देशातील प्रत्येक मतदाराचा सहभाग दर्शविते. बोधचिन्हातील ‘बरोबर’ची खूण मतदारांच्या माहितीपूर्ण निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची निदर्शक आहे.

राजधानी दिल्लीत राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज भारत निवडणूक आयोगाने एका सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात सन्माननीय पाहुणे म्हणून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते वर्ष 2022 साठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण केले जाईल. तसेच यावेळी वर्ष 2022 पूर्वीच्या निवडणुकीच्या काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना उत्तम पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दलचे राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात येतील.

Ganesh Jayanti 2023 Images in Marathi: माघी गणेश जयंती निमित्त मराठी शुभेच्छा फोटो

Maghi Ganesh Jayanti 2023 : कधी आहे माघी गणेश जयंती? माघी गणेश जयंती का साजरी करतात?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी