NaturalFarming : पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दिला पूर अन् दुष्काळाच्या संकटाला तोंड देणाऱ्या शेती मंत्र

PM Modi Address to Farmers, National Summit on Agro & Food Processing: पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शिखर परिषदेचे लक्ष नैसर्गिक शेतीवर केंद्रित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याच्या फायद्यांविषयी सर्व आवश्यक माहिती देण्यात आली आहे.

PM Modi gives zero budget agriculture mantra to farmers
PM मोदींनी शेतकऱ्यांना दिला 'झिरो बजेट' शेतीचा मंत्र  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत - पंतप्रधान
  • कमी सिंचन असलेली जमीन असो किंवा जास्त पाणी असलेली जमीन असो, शेतकरी नैसर्गिक शेतीद्वारे वर्षभरात अनेक पिके घेऊ शकतात.
  • शेतकरी शेतीसोबतच पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा, जैव इंधन यांसारख्या अनेक पर्यायी उत्पन्नाच्या स्त्रोतांशी जोडले जात आहेत. - पंतप्रधान मोदी

PM Modi in National Summit on Agro & Food Processing : नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज राष्ट्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया परिषदेदरम्यान (National Council for Agriculture and Food Processing) शेतकऱ्यांना (Farmers) संबोधित केले. गुजरात (Gujarat) मधील आणंद येथे आयोजित राष्ट्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया परिषदेच्या समारोपाच्या सत्रादरम्यान, पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स (Video conference) द्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या शिखर परिषदेचा भर नैसर्गिक शेतीवर (Natural farming) आहे आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब केल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत सर्व आवश्यक माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाईल. (PM Modi gives zero budget agriculture mantra to farmers)

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका

शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आजचा दिवस कृषी क्षेत्र, शेती आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मी देशभरातील शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 8 कोटी शेतकरी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत.

'शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर'

पीएम मोदी म्हणाले की, शेतकरी शेतीसोबतच पशुपालन, मधमाशी पालन, मत्स्यपालन आणि सौर ऊर्जा, जैव इंधन यांसारख्या अनेक पर्यायी उत्पन्नाच्या स्त्रोतांशी जोडले जात आहेत. गावांमध्ये साठवणूक, शीतसाखळी आणि अन्न प्रक्रिया यावर भर देण्यासाठी लाखो कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बियाण्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकामागून एक अनेक पावले उचलली गेली आहेत. माती परीक्षणापासून शेकडो नवीन बियाण्यांपर्यंत आमच्या सरकारने काम केले आहे. पीएम मोदी असेही म्हणाले की, 'किसान सन्मान निधीपासून ते खर्चाच्या दीडपट एमएसपीपर्यंत आणि सिंचनाच्या मजबूत नेटवर्कपासून किसान रेलपर्यंत आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.'

'झिरो बजेट शेतीचा मंत्र'

नैसर्गिक शेती#NaturalFarming याचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, हरितक्रांतीत रसायने आणि खतांची महत्त्वाची भूमिका आहे हे खरे आहे. पण त्याचवेळी त्याच्या पर्यायांवर काम करत राहावं लागतं, हेही तितकंच खरं आहे. बियाण्यापासून मातीपर्यंत, आपण प्रत्येक गोष्टीवर नैसर्गिक पद्धतीने उपचार करू शकता. नैसर्गिक शेतीमध्ये खते किंवा कीटकनाशकांवर खर्च होत नाही. याला कमी सिंचनाची गरज आहे आणि पूर आणि दुष्काळाला तोंड देण्यास सक्षम असते.

पीएम मोदी म्हणाले, 'कमी सिंचन असलेली जमीन असो किंवा जास्त पाणी असलेली जमीन असो, शेतकरी नैसर्गिक शेतीद्वारे वर्षभरात अनेक पिके घेऊ शकतात. एवढेच नाही तर गहू, भात, कडधान्ये पिकवताना जो काही कचरा शेतातून बाहेर पडतो, पेंढा येतो, त्याचाही यामध्ये चांगला वापर केला जातो. म्हणजे कमी खर्च, जास्त नफा. आपल्याला फक्त आपले प्राचीन शेतीचे ज्ञान पुन्हा शिकण्याची गरज नाही, त्यापेक्षा त्याला आधुनिक काळानुसार पॉलिश करण्याचीही गरज आहे. या दिशेने प्राचीन ज्ञानाला आधुनिक वैज्ञानिक चौकटीत बसवून नव्याने संशोधन करावे लागेल. नवीन शिकण्यासोबतच शेतीच्या पद्धतीत झालेल्या चुकाही विसरायला हव्यात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शेतात आग लावल्याने पृथ्वीची सुपीक क्षमता नष्ट होते.

मानसिकता बदलण्याची गरज आहे

पीएम मोदी म्हणाले की, रसायनांशिवाय पीक चांगले येणार नाही, असा भ्रमही निर्माण झाला आहे. पण खरं पाहिलं तर पूर्वी रसायने नव्हती, तरीही पीकं चांगली होती. मानवतेच्या विकासाचा इतिहास याचा साक्षीदार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी