Prophet Controversy: नवीन जिंदाल यांनी कुटुंबासह सोडली दिल्ली, म्हणाले- 'इस्लामी कट्टरपंथीयांकडून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका'

प्रेषित मुहम्मद (Prophet Muhammad) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली असून आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे जिंदाल यांना येत असलेल्या धमक्यांमुळे त्यांना दिल्ली सोडावी लागली आहे.

Jindal had to leave Delhi for making controversial statement
वादग्रस्त विधान केल्यानं जिंदलांना सोडावी लागली दिल्ली  
थोडं पण कामाचं
  • विनंती करुनही जिंदाल यांच्या घराचा पत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
  • काही लोकांनी नवीन जिंदाल यांच्या घराची रेकी केली.

नवी दिल्ली : प्रेषित मुहम्मद (Prophet Muhammad) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात निर्माण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली असून आंदोलकांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर दुसरीकडे जिंदाल यांना येत असलेल्या धमक्यांमुळे त्यांना दिल्ली सोडावी लागली आहे.

भाजपचे बडतर्फ नेते (BJP leader) नवीन जिंदाल (Naveen Jindal) आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी कुटुंबासह दिल्ली सोडली आहे. जिंदाल यांनी पैगंबर मुहम्मद (Prophet Muhammad) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाल्यानंतर त्यांची भाजपमधून (BJP) हकालपट्टी करण्यात आली होती.  भाजपच्या निलंबित प्रवक्त्या (Spokesperson) नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विधानाच्या समर्थनार्थ जिंदाल यांनी ही टिप्पणी केही होती, जी पैगंबरांच्या विरोधात होती.

पोलिसांनी गांभीर्याने घेतलं हे प्रकरण

काही दिवसांपूर्वी ते एखाद्याला भेटायला गेले असता काही लोक त्यांचा पाठलाग करत असल्याचा आरोपही या बडतर्फ नेत्याने केला आहे. अज्ञात व्यक्तींनी कथितरित्या त्याच्या घराची रेकी केली होती. सोशल मीडियावर या प्रकराच्या चर्चो होत आहेत. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रर दिली आहे, यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. 

माझ्या कुटुंबातील सदस्यांची माहिती शेअर करू नका

नवीन जिंदाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझी सर्वांना पुन्हा नम्र विनंती आहे की माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांबद्दलची कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू नका.  कारण इस्लामिक कट्टरतावाद्यांपासून माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. दरम्यान माझ्या विनंतीनंतरही अनेक लोक माझ्या राहत्या घराचा पत्ता सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत, 

नवीन जिंदाल यांना सातत्याने धमक्या येत आहेत

नवीन जिंदाल यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आत्ताच मला आणि माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आम्हाला सकाळी 11:38 वाजता +918986133931 या क्रमांकावरून कॉल केला आहे. मी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी