दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ११ मे २०१९:  सिद्धूंची जीभ घसरली ते आलिया अनुष्काची लाखो रूपयांची बॅग

लोकल ते ग्लोबल
Updated May 11, 2019 | 22:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

Headlines of the day: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily Top News
दिवसभरातील ५ बातम्या   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात. लोकसभा निवडणूक २०१९ सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या होणार आहे. त्याआधीच लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मात्र प्रचारादरम्यान सर्वच पक्षातील नेते मुख्य मुद्द्यांवर कमी तर वैयक्तिक टीका अधिक करताना दिसत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धूनं पुन्हा एकदा मोदींवर वैयक्तिक टीका केलीय. दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यानंतर आज दिवसभरात तिसरी धक्कादायक घटना घडली ती वजेश्वरी मंदिरात दरोडा पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुसरीकडे उद्या आयपीएल २०१९ चा फायनल सामना रंगणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नईत हा सामना रंगेल. पाचवी बातमी आहे झगमगाट विश्वातील. विमानतळावर आलिया अनुष्काला एकच बॅगसोबत स्पॉट करण्यात आलं. या बॅगची किंमत लाखोच्या घरात.  वाचा या बातम्या विस्ताराने वाचूया. 

नवज्योतसिंग सिद्धूंची घसरली जीभ : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान सर्वच पक्षातील नेते मुख्य मुद्द्यांवर कमी तर वैयक्तिक टीका अधिक करताना दिसत आहेत. पाहा आता काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धूंचं वक्तव्य. बातमी वाचा सविस्तर.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच 'या' ठिकाणी भाजप अव्वल तर काँग्रेस : लोकसभा निवडणुकांच्या निकालापूर्वीच भाजपसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. होय, सोशल मीडियातील ट्विटरवर भाजपच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. तर काँग्रेसच्या पक्षाच्या फॉलोअर्सची संख्या भाजपपेक्षा कमी आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक लिंक करा.

वज्रेश्वरी मंदिरात दरोडा, घटना सीसीटीव्हीत कैद:   भिवंडी येथे असलेल्या प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. चेहऱ्यावर कपडा बांधून आलेल्या चोरट्यांनी दानपेटीतील सात लाखांची रोकड लंपास केली आहे. बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

मुंबई विरुद्ध चेन्नईत रंगणार सामना 'या' ठिकाणी पाहू शकता फायनल मॅच :  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2019 च्या मोसमातील फायनल मॅच रविवारी होत आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सायंकाळी ही मॅच होणार आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

एअरपोर्टवर आलिया अनुष्काची एकच बॅग:  एअरपोर्टवर एक सारख्या बॅग घेतलेल्या बॉलिवूड एक्ट्रेस आलिया भट्ट आणि अनुष्का शर्मा स्पॉट करण्यात आलं. दोघींची सुंदर बॅग खूपच महाग आहे. या बॅगची किंमत ऐकून तुम्हांला धक्काच बसेल. बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी