Navjot Singh Sidhu: नवज्योतसिंग सिद्धू यांना तुरुंगात मिळाले सहाय्यकाचे काम; दोन शिफ्टमध्ये असते ड्युटी

लोकल ते ग्लोबल
Updated May 26, 2022 | 11:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navjot Singh Sidhu News | भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू सध्या ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगत आहे.

Navjot Singh Sidhu gets assistant job in jail, Duty consists in two shifts
नवज्योतसिंग सिद्धू यांना तुरुंगात मिळाले सहाय्यकाचे काम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवज्योतसिंग सिद्धू सध्या ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगत आहे.
  • सिद्धू यांना तुरुंग प्राधिकरणाने पटियाला केंद्र कारागृहात सहाय्यक म्हणून काम सोपवले आहे.
  • सिद्धू यांनी मंगळवारपासूनच आपले काम सुरू केले आहे.

Navjot Singh Sidhu News | नवी दिल्ली : भारताचे माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू सध्या ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणात एक वर्षाची शिक्षा भोगत आहे. त्यांना तुरुंग प्राधिकरणाने पटियाला केंद्र कारागृहात सहाय्यक म्हणून काम सोपवले आहे. तुरुंगाच्या भाषेत त्याला मुन्शी असे म्हणतात. (Navjot Singh Sidhu gets assistant job in jail, Duty consists in two shifts). 

तुरूंगांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांनी मंगळवारपासूनच आपले काम सुरू केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू आपले काम २ शिफ्टमध्ये पूर्ण करणार आहेत. एक शिफ्ट सकाळी ९ ते १२ आणि दुसरी दुपारी ३ ते ५ पर्यंत असेल. दरम्यान त्यांना ३ तासांचा ब्रेकही मिळणार आहे.

अधिक वाचा : हे घरगुती उपाय केल्याने आठवड्याभरात वजन होईल कमी

तुरूंगातील जेवण खाण्यास सिद्धूंचा नकार 

अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की सिद्धू यांनी तुरूंगातील जेवण खाण्यास नकार दिला आहे. त्याचा त्यांच्या तब्येतीवरही परिणाम होत आहे. सोमवारी त्यांना पाटियाला येथील राजेंद्र हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सिद्धू यांनी सांगितले की, मला गव्हाची ॲलर्जी आहे, त्यामुळे त्यांनी तुरूंगातील अन्न खाण्यास नकार दिला. ते तुरूंगातील डाळ-चपाती खात नाहीत. ते फक्त कोशिंबीर खाऊन उदरनिर्वाह करत आहेत.

दरम्यान, सिद्धू यांचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांचे म्हणणे आहे की, सिद्धू यांना गव्हाची ॲलर्जी आहे. ते गव्हाची चपाती खाऊ शकत नाही. तसेच ते बऱ्याच दिवसांपासून चपाती खात नाहीत, म्हणून त्यांनी खास डाएट मागवला आहे.

अधिक वाचा : श्रीलंकेऐवजी या देशाला मिळू शकते आशिया कपचे यजमानपद

डाएट चार्ट जारी 

हॉस्पिटलने जारी केलेल्या डाएट चार्टमध्ये सिद्धू यांनी रोज सकाळी रोझमेरी चहा, अर्धा ग्लास पांढऱ्या पेठेचा रस किंवा नारळ पाणी प्यावे, असे म्हटले आहे. दुपारच्या जेवणापूर्वी सिद्धू यांनी बीटरूट, तूप, काकडी, मोसमी, तुळस, आवळा यांचा एक ग्लास ज्यूस पिणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, रस न घेतल्यास हिरवे हरभरे, काकडी, टोमॅटो, लिंबू सोबत अंकुरलेल्या काळ्या हरभऱ्याचे सेवन करावे. नाश्त्यामध्ये एक ग्लास दूध सोबत एक चमचा फ्लेक्ससीड, खरबूज किंवा सूर्यफुलाच्या बिया घेणे आवश्यक आहे. तसेच ५-६ बदाम, १ अक्रोड यांचेही सेवन करायला हवे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी