Navneet Rana | मॉडेलिंग, सिनेमा, प्रेमविवाह, राजकारण ते हनुमान चालिसा....नवनीत राणांचा प्रवास आणि योग शिबिरापासूनची राणा दांपत्याची लव्ह स्टोरी!

Rana Couple : महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी राज्यातील शिवसेना सरकारशी थेट संघर्ष सुरू केला आहे.राज्याच्या राजकारणात अचानक केंद्रस्थानी आलेल्या नवनीत राणा आज भलेही चर्चेत असतील, पण एक काळ असा होता की त्यांना राजकारणाबद्दल काहीच माहीत नव्हते. बाबा रामदेव यांच्या योग शिबिरात जात असताना तिची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली.

Navneet Rana love story
नवनीत राणाची प्रेम कहाणी आणि करियर 
थोडं पण कामाचं
  • अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी
  • एकेकाळी चित्रपटात येण्यासाठी नवनीतने शिक्षण सोडले होते
  • योग शिबिरात सुरू झाली राणा दांपत्यांची प्रेमकहाणी आणि नवनीतच्या राजकीय करियरची इनिंग

Navneet Rana Hanuman Chalisa Controversy : नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष खासदार नवनीत राणा सध्या चर्चेत आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी राज्यातील शिवसेना सरकारशी थेट संघर्ष सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचे आव्हान दिले. मात्र शिवसेनेचा आक्रमकपणा आणि पोलिसांनी दिलेली नोटिस या पार्श्वभूमीवर तसेच पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि सांगितले की रविवारी पंतप्रधान मोदींची मुंबई भेट लक्षात घेऊन त्यांनी आपली पावले मागे घेतली आहेत. (Navneet Rana's love story & her career from films to politics)

अधिक वाचा : Rana Kapoor Statement | प्रियंका गांधींकडून 2 कोटींचे पेंटिंग खरेदी करण्यास मला भाग पाडले: येस बँकेचे राणा कपूर यांचा धक्कादायक खुलासा

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी

गेल्या दोन दिवसांपासून 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांची गर्दी होती. खासदार नवनीत राणा यांनी 'मातोश्री'वर हनुमान चालिसा वाचणार असल्याच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. राज्याच्या राजकारणात अचानक केंद्रस्थानी आलेल्या नवनीत राणा आज भलेही चर्चेत असतील, पण एक काळ असा होता की त्यांना राजकारणाबद्दल काहीच माहीत नव्हते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नवनीत राणा एकेकाळी साऊथ चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री होती.

अधिक वाचा : Jammu-Kasmhir: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्‍यापूर्वी जम्मूमध्ये स्फोट, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

नवनीत राणांची सिने कारकीर्द

आज राजकारण करत असलेल्या नवनीतने कधीकाळी चित्रपटात येण्यासाठी शिक्षण सोडले होता. नवनीत राणा यांचा जन्म 3 जानेवारी 1986 रोजी मुंबई येथे झाला. नवनीतचे आई-वडील पंजाबी आहेत. नवनीतची आई गृहिणी होती, तर वडील लष्करात अधिकारी होते. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी नवनीत कौरने 12वीनंतर आपले शिक्षण सोडले आणि मॉडेलिंगला सुरुवात केली. मॉडेलिंगच्या सुरुवातीला तिने 6 म्युझिक अल्बममध्ये काम केले. यानंतर नवनीतने 'दर्शन' नावाच्या कन्नड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

अधिक वाचा : हिंदी-चिनी भाई-भाईंना एकमेंकांच्या देशात नो एंट्री; चिनी नागरिकांचा टुरिस्ट व्हिसा भारताकडून निलंबित

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये प्रसिद्धी

नवनीत कौरने सीनू, वासंती आणि लक्ष्मी या तेलगू चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची छाप सोडली. चेतना, जगपथी, गुड बॉय आणि भूमा या चित्रपटांमध्ये तिला अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती हम्मा-हम्मा या रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. 'लव्ह इन सिंगापूर' या मल्याळम चित्रपटाव्यतिरिक्त तिने पंजाबी चित्रपट 'लड गये पेंच'मध्येही काम केले होते.

योग शिबिरात प्रेमाची सुरूवात 

2011 हे वर्ष नवनीतच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. त्याच वर्षी ती योगगुरू बाबा रामदेव यांच्या शिबिरात गेल्याचे सांगण्यात येत आहे. योग शिबिरात जात असताना तिची भेट राजकारणी रवी राणा यांच्याशी झाली. प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार, येथूनच दोघांमधील प्रेमाची सुरुवात झाली. यानंतर दोघांनी 2011 मध्ये सामूहिक विवाह कार्यक्रमात रवी राणासोबत लग्न केले. या सोहळ्यात 3200 जोडप्यांचे एकत्र लग्न लावण्यात आले. त्यांच्या लग्नानेही जबरदस्त प्रसिद्धी मिळवली होती. कारण एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सामूहिक विवाह कार्यक्रमात लग्न करण्याची ही पहिलीच वेळ होती. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाबा रामदेव आणि सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो राय यांसारख्या सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती.

रवी राणासोबत लग्न केल्यानंतर नवनीतने पूर्णपणे राजकारणात प्रवेश केला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, तिने राष्ट्रवादीच्या तिकिटावर अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्या निवडणुकीत तिचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणाने अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला आणि विजय मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जात प्रमाणपत्रावरूनही ती वादात सापडली आहे. आता यापुढच्या काळात राणा दांपत्य नेमकी कोणती भूमिका घेते आणि कोणते राजकारण करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी