दिल्लीतली शरद पवारांची सुरक्षा तडकाफडकी हटवली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्य

NCP chief Sharad Pawar
दिल्लीतली शरद पवारांची सुरक्षा तडकाफडकी हटवली  |  फोटो सौजन्य: ANI

नवी दिल्लीः राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे.  तर . पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत.  20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले असून मोदी सरकारकडून कोणतीही पूर्वसूचना न देता सुरक्षा रक्षक कमी केलेत. याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीव्हीआयपी) केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते.  राज्यात शरद पवार यांना Z security आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. पवारांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व सुरक्षा व्यवस्था सोमवार 20 जानेवारीपासून हटवण्यात आल्याचं समोर आलं आहे.  

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्यात आली. त्यांना आता 'झेड प्लस' सुरक्षा देण्यात येणार आहे. म्हणजेच त्यांना सीआरपीएफचं सुरक्षाकवच असेल. त्यांच्यासोबत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता पवारांची सुरक्षा हटवण्यात आली आहे.

VIP सुरक्षेतून NSG कमांडो होणार मुक्त, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

काही दिवसांपूर्वी सरकारनं एनएसजींना व्हीआयपी सुरक्षेतून पूर्णपणे मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढल्यानंतर आणि व्हीआयपी सुरक्षेत मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर आता केंद्र सरकारनं एनएसजी कमांडोबाबत मोठा निर्णय घेतला.एनएसजी कमांडोजची स्थापना दहशतवादी विरोधी पथक म्हणून केली गेली होती. मात्र या ‘ब्लॅक कॅट’ कमांडोजना व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. मूळात या कामासाठी त्यांची स्थापना झाली नव्हती. १९८४ साली जेव्हा एनएसजीची स्थापना झाली होती, तेव्हा त्यांच्या प्राथमिक कामांमध्ये व्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी नव्हती. हे दल फक्त जवळील आणि मोबाईल सुरक्षा कवच म्हणून काम करतं. असॉल्ट शस्त्रांनी परिपूर्ण असे हे एनएसजी कमांडो ‘झेड प्लस’ श्रेणीमध्ये येणाऱ्या १३ अतिदक्ष असलेल्या व्हीआयपींना सुरक्षा प्रदान करतात.

एनएसजी कमांडो यांच्या सुरक्षेत तब्बल २ डझन म्हणजेच जवळपास २४ कमांडो अत्याधुनिक शस्त्रांसह सतत व्हीआयपी सोबत असतात. मात्र आता एनएसजी यांची सुरक्षा ड्यूटी लवकरच निमलष्करी दलाला सोपवली जाणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुरक्षा देणाऱ्या एनएसजी दलाला लवकरच निमलष्करी दलामध्ये बदललं जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी