N.D.Tiwari Son Case: एन. डी. तिवारींच्या मुलाच्या खून प्रकरणात सस्पेंस वाढला

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 23, 2019 | 14:05 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Crime : एन. डी. तिवारी यांच्या मुलगा रोहितचा दिल्लीत खून झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. एम्सच्या फॉरेंसिक विभागाने रोहितचा मृत्यू गळा आणि नाक दाबल्याने झाल्याचे म्हटले आहे.

Rohit Tiwar son of late N. D. Tiwari
रोहित तिवारीच्या खूनप्रकरणी वेगळा खुलासा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • रोहित तिवारीच्या खून प्रकारणाला रोज वेगळे वळण
  • रोहित तिवारीच्या आईचा आता नवा खुलासा
  • रोहितचे पत्नीशी पहिल्या दिवसापासून होते मतभेद

नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांच्या मुलगा रोहित तिवारीच्या खून प्रकरणात सस्पेन्स वाढतच चालला आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होऊ लागल्याने तपास यंत्रणाही संभ्रमावस्थेत आहे. आता रोहितच्या आईने आणखी एक नवा खुलासा केला आहे. रोहित आणि त्याच्या पत्नीमध्ये चांगले संबंध नव्हते, असे त्यांनी सांगितल्याने आता तपास यंत्रणा त्या दिशेही तपास घेऊ लागली आहे.

धक्कादायक पोस्टमॉर्टम रिपोर्ट

एन. डी. तिवारी यांच्या मुलगा रोहितचा दिल्लीत खून झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पहिल्यांदा रोहितचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात आलं होतं. पण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये रोहितचा मृत्यू गळा आणि नाक दाबला होता.त्यामुळे त्याला श्वास न घेता आल्यानं झाल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत दिल्लीतील एम्सच्या फॉरेंसिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, रोहित तिवारी यांचा मृत्यू गळा आणि नाक दाबल्याने झाल्याच्या निष्कर्षापर्यंत मेडिकल बोर्ड पोहोचले आहे. रोहित यांचा मृत्यू अचानक झालेला आहे आणि तो असामान्य आहे. त्यामुळे त्याला खून किंवा हत्या, असेच म्हणता येईल. एम्स रुग्णालयातून मिळालेल्या पोस्ट मॉर्टर रिपोर्टनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्या दिशेने तपासही सुरू केला आहे.

कोण आहे रोहित?

रोहित तिवारी हा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एन. डी. तिवारी यांचा मुलगा. पण, तिवारी यांनी रोहितला आपला मुलगा घोषित करायला नकार दिला होता. स्वतःला तिवारी यांचा मुलगा सिद्ध करण्यासाठी रोहितला खूप मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली होती. त्यात तो यशस्वीही झाला होता. तिवारी आणि रोहित यांच्या डीएनए चाचणीनंतर रोहित त्यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले होते. रोहितचा २०१८मध्ये विवाह झाला होता. त्याने भाजपमध्ये प्रवेशही केला होता. पण, राजकारणात उतरायचे की नाही, याविषयी तो संभ्रमात होता.

आईचे धक्कादायक वक्तव्य

रोहित यांच्या आई उज्ज्वला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. उज्ज्वला यांनी सांगितले की, रोहित आणि त्याच्या पत्नीचे संबंध चांगले नव्हते. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्यात खटके उडत होते. रोहित सक्रीय राजकारणात पाऊल टाकायचे की नाही यावरून खूप चिंतेत होते. काही दिवसांपूर्वी तो वडील एन. डी. तिवारी यांच्यावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणीही जाऊन आला होता. त्या म्हणाल्या, ‘रोहितचा खून झाला हेच माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. आता मी काय बोलू?’ रोहितला मंगळवारी तुम्ही उठवले का नाही? तो दुपारी चार वाजेपर्यंत झोपला होता. त्यावर उज्ज्वला यांनी त्याचे पत्नीसोबत संबंध चांगले नसल्याचा खुलासा केला. आता रोहितचा खून नेमका कोणी केला? यावरून खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे आहे. त्याच्या तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
N.D.Tiwari Son Case: एन. डी. तिवारींच्या मुलाच्या खून प्रकरणात सस्पेंस वाढला Description: Crime : एन. डी. तिवारी यांच्या मुलगा रोहितचा दिल्लीत खून झाल्यानंतर त्याविषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. एम्सच्या फॉरेंसिक विभागाने रोहितचा मृत्यू गळा आणि नाक दाबल्याने झाल्याचे म्हटले आहे.
Loading...
Loading...
Loading...