माजी मुख्यमंत्री एन डी तिवारींचा मुलगा रोहितच्या मृत्यूप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 24, 2019 | 13:19 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Rohit Shekhar Tiwari Murder: उत्तरप्रदेश-उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वा शुक्लाला अटक केली आहे.

Rohit Shekhar Tiwari
रोहित शेखर तिवारी (फाईल फोटो) 

नवी दिल्ली:  उत्तरप्रदेश-उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारीच्या मृत्यूचं गूढ आता आणखी वाढत चाललं आहे. कारण रोहितच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याची पत्नी अपूर्वा शुक्ला हिला अटक केली आहे. रोहित शेखरचा १६ एप्रिलला मृत्यू झाला होता. यावेळी त्याचा मृतदेह हा संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्यावेळी रोहितच्या मृत्यू हा हृदयविकाराने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालात रोहितचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याची गळा, तोंड आणि नाक दाबून हत्या करण्यात आल्याचं म्हटलं आहे.  

एम्स रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनानंतर पोलिसांनी गुरूवारी खुनाचा गुन्हा नोंदवून त्यासंबंधीचा तपास हा क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. एम्स फॉरेंसिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी या प्रकरणी असं म्हटलं होतं की,मेडिकल बोर्ड सर्वांच्या संमतीनं या निष्कर्षावर पोहोचलं आहे की, हा मृत्यू गळा दाबल्यानं आणि तोंड, कान बंद केल्यामुळं श्वास कोंडल्याने झाला. हा अचानक आणि अनैसर्गिक मृत्यू आहे. जे की हत्येच्या कक्षेत येतं.'

(अपूर्वा शुक्ला फोटो सौजन्य- ANI)

 

क्राईम ब्रांचच्या टीमनं शेखर तिवारी यांच्या डिफेन्स कॉलनीमध्ये असलेल्या निवासस्थानी जाऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांना या प्रकरणात पहिल्यापासूनच काही तरी काळंबेरं असल्याचा संशय आल्याने त्यांनी हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपावलं होतं. यानंतर क्राईम ब्रांचची टीम सीएफएसएल टीमसोबत मिळून त्यांच्या घरी पोहोचली आणि घराची झडती घेत तपास सुरू केला.

 

 

दिल्ली पोलिसांनी रोहित शेखर तिवारीची पत्नी अपूर्वाची सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी तिच्या घरी चौकशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणीच्या फॉरेंसिक लॅब तज्ज्ञांनी सुद्धा रविवारी डिफेन्स कॉलनीतील रोहित तिवारीच्या घरी जाऊन तपास केला आणि गुन्ह्याचा घटनाक्रम लक्षात घेतला.

फॉरेंसिक टीमचं म्हणणं आहे की, गळा दाबला जात असतांना रोहितकडून त्याचा विरोध होण्याच्या कोणत्याही खुणा सापडल्या नाहीत. टीमनं रोहितला ऍम्बुलन्स येण्यापूर्वी ज्या गाडीत झोपवलं होतं त्या गाडीचाही शोध घेतला. पोलिसांनी अपूर्वा आणि घरातील दोन नोकरांना चौकशीसाठी रविवारी ताब्यात घेतलं होतं.

रोहित शेखरची आई उज्वला यांनी, रोहित आणि अपूर्वाचे संबंध चांगले नव्हते असा जबाब नोंदवल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. कारण त्यानंतरच पोलिसांनी त्या दिशेने आपला तपास सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी अपूर्वाची वारंवार चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान अपूर्वाने अनेकदा आपला जबाब बदलला होता. अखेर पोलिसांनी आज तिला अटक केली. 

दरम्यान, रोहित राजकारणातील त्याचं करिअर पुढं जात नसल्यानं निराश आणि चिंताग्रस्त होता. सोबतच काही दिवसांपूर्वी त्याचे वडील माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचं अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणीही तो जाऊन आला होता, असंही आई उज्ज्वला यांनी पोलिसांना सांगितलं होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माजी मुख्यमंत्री एन डी तिवारींचा मुलगा रोहितच्या मृत्यूप्रकरणी पत्नी अपूर्वाला अटक Description: Rohit Shekhar Tiwari Murder: उत्तरप्रदेश-उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी रोहितची पत्नी अपूर्वा शुक्लाला अटक केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
पॉर्न सिनेमा पाहून तसेच कृत्य करणं बेतलं जीवावर, तरुणाचा मृत्यू
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
[VIDEO]: दिल्लीतील एम्स रुग्णालयाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
UNSC: पाक पुन्हा फेल, UNमध्ये पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटलं
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
Arun Jaitley Health Updates: अरूण जेटली यांची प्रकृती चिंताजनक; अमित शहा, योगी एम्समध्ये दाखल
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
पाकिस्तानकडून LoCजवळ पुन्हा गोळीबार, पाकिस्तानची एक चौकी उद्ध्वस्त
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, १७ ऑगस्ट २०१९: LoC जवळ गोळीबार ते एम्स रुग्णालयाला आग
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
[VIDEO]: भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्या पाक समर्थकांना भिडल्या भारताच्या शाझिया इल्मी
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू
Artical 370: जम्मू काश्मीरमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरू, सोमवारपासून शाळा,कॉलेज होणार सुरू