NEET PG 2022:  वेळापत्रकासंदर्भात मोठी बातमी, पाहा कधी होणार परीक्षा 

पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे.

NEET PG 2022 Candidates no change in examination schedule The exam will be held this month
NEET PG 2022:  वेळापत्रकासंदर्भात मोठी बातमी, पाहा कधी होणार परीक्षा  
थोडं पण कामाचं
  • पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे.
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात येणारी NEET परीक्षा (NEET PG Exam 2022) ही लवकरच घेण्यात येणार आहे.
  • . दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेसाठी नोंदणी करतात.

मुंबई : पदवी स्तरावरील वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमांना (Medical Entrance exam) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात येणारी NEET परीक्षा (NEET PG Exam 2022) ही लवकरच घेण्यात येणार आहे. दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेसाठी नोंदणी करतात. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी ही प्रवेश परीक्षा अत्यंत अवघड आणि किचकट असते आणि त्यात काही हजार विद्यार्थीच यशस्वी होतात. यंदा NEET PG ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार की काय अशी चर्चा सुरु होती.

अधिक वाचा : Bollywood कलाकारांच्या बालपणीच्या वाईट आठवणी

मात्र आता NTA नं ही परीक्षा वेळेतच घेण्यात येणार असं जाहीर केलं आहे.  NEET PG 2022 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. विद्यार्थ्यांनी  मागणी करण्यात आली होती की, या वेळापत्रकात बदल करावा. पण NEET PG परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

NEET परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना आता या PG अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी अंतिम रिव्हिजन सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परीक्षा नियोजित तारखेलाच NEET PG 2022 ची परीक्षा 21 मे रोजी होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ती पुढे ढकलण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर बराच काळ सुरू होता. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

अधिक वाचा : सीईटीच्या ऑनलाईन अर्जासाठी 11 मेपर्यंत मुदतवाढ

आता त्यांना पूर्वी ठरलेल्या तारखेलाच NEET परीक्षा द्यावी लागेल. 30 एप्रिल रोजी हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील उपस्थित होते.

 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी NEET PG 2021 समुपदेशनाला उशीर झाल्यामुळे आणि प्रवेश परीक्षा आणि समुपदेशन वेळापत्रकात कमी अंतर यामुळे, अनेक उमेदवार NEET PG परीक्षा 2022 पुढे ढकलण्याची मागणी करत होते. तयारीसाठी फारसा वेळ मिळत नसल्याने तणाव निर्माण होतो, असे त्यांचे मत होते. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी