NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने दिला हा निकाल 

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. NEET PG 2022 परीक्षेची दिनांक  पूर्वनियोजीत असणार आहे, पूर्वी ठरल्याप्रमाणे परीक्षा २१ मे २०२२ रोजी घेतली जाईल. परीक्षेची पद्धती ही ऑफलाइन असणार आहे. शिवाय, NEET PG चे प्रवेशपत्र १६ मे २०२२ रोजी  ऑफिशियल वेबसाइट - nbe.edu.in वर प्रसिद्ध केले जाईल.

neet pg 2022 sc refuses to postpone neet pg exam read in marathi
NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणीवर SCचा निकाल 
थोडं पण कामाचं
  • नीट पीजी परीक्षा निर्धारित वेळेत 
  • NEET PG 2022 पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका SC ने फेटाळली
  • परीक्षा २१ मे २०२२ रोजी घेतली जाईल. 

NEET PG 2022 Exam Date : नॅशनल एलिजिबिलीटी ( राष्ट्रीय पात्रता) सह प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. शुक्रवारी १३ मे २०२२ रोजी या याचिकेवरील सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना वरील निकाल सुनावण्यात आला आहे. 

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. NEET PG 2022 परीक्षेची तारीख पूर्वीप्रमाणेच राहील.  परीक्षा २१ मे २०२२ रोजी घेतली जाईल. परीक्षा सर्वांसाठी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. शिवाय, NEET PG चे प्रवेशपत्र १६ मे २०२२ रोजी अधिकृत वेबसाइट - nbe.edu.in वर प्रसिद्ध केले जाईल.

कोर्टाने जानेवारी २०१६ मध्ये वैद्यकीय प्रवेशांचे वेळापत्रक निश्चित केले होते. जर नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली तर या प्रवेशाच्या वेळापत्रकावर परिणाम होईल.

या परीक्षेला आधीच ४ महिन्यांचा विलंब झाला आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की NEET PG परीक्षेच्या वेळापत्रकात आणखी वाढ केल्यास जानेवारी २०१६ मध्ये न्यायालयाने सेट केलेल्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होईल. त्यामुळे यापुढे परीक्षा पुढे ढकलता येणार नाही. त्याच वेळी, केंद्र सरकार म्हणते की NEET PG 2023-24 चे आयोजन जानेवारी २०२३ मध्ये निश्चित करण्यात आले आहे. त्याचवेळी, कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेला प्रवेश कार्यक्रम मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होती सोशल मीडियावर 

NEET PG 2022 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी काही काळापासून जोर धरू लागली होती. यासाठी उमेदवारांकडून सोशल मीडियावर सातत्याने प्रचार सुरू होता. परीक्षा किमान ८ ते १० आठवडे पुढे ढकलण्याची विनंती उमेदवार करत होते. या परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. NEET PG समुपदेशन २०२१ मध्ये उशीर झाल्यामुळे उमेदवारांना तयारीसाठी जास्त वेळ मिळाला नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी