NEET PG 2022 स्कोअरकार्ड जाहीर

NEET PG 2022 Scorecard, How To Download : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (National Board of Examinations in Medical Science, NBEMS) nbe.edu.in या वेबसाईटवर नीट पोस्ट ग्रॅज्युएट २०२२ (NEET PG 2022) ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींचे स्कोअरकार्ड जाहीर केले आहे.

NEET PG 2022 Scorecard
NEET PG 2022 स्कोअरकार्ड जाहीर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • NEET PG 2022 स्कोअरकार्ड जाहीर
  • स्कोअरकार्ड डाऊनलोड करता येईल
  • लवकरच पात्र उमेदवारांसाठी समुपदेशन फेरी

NEET PG 2022 Scorecard, How To Download : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (National Board of Examinations in Medical Science, NBEMS) nbe.edu.in या वेबसाईटवर नीट पोस्ट ग्रॅज्युएट २०२२ (NEET PG 2022) ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींचे स्कोअरकार्ड जाहीर केले आहे. प्रत्येक परीक्षार्थी आपापले स्कोअरकार्ड nbe.edu.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतो. स्कोअरकार्ड डाऊनलोड करून घेण्यासाठी nbe.edu.in या वेबसाईटवर जाऊन NEET PG 2022 या टॅवर क्लिक करा. यानंतर संबंधित परीक्षार्थीने त्याचा युझर आयडी (USER ID) आणि पासवर्ड (PASSWORD) टाकणे आवश्यक आहे.

परीक्षार्थीने नीट पीजीचे स्कोअरकार्ड डाऊनलोड करून घेतल्यानंतर स्वतःचे नाव, जन्मतारीख, रोल नंबर, आरक्षण प्रवर्ग श्रेणी, मिळालेले गुण, योग्य आणि अयोग्य प्रतिसादांची संख्या, रँक ही माहिती लगेच तपासून घ्यावी.

वैद्यकीय उमेदवारांच्या पदव्युत्तर परीक्षेसाठी स्कोअरकार्ड जाहीर केल्यानंतर, वैद्यकीय समुपदेशन समिती (Medical Counselling Committee, MCC) पात्र उमेदवारांसाठी समुपदेशन फेरी आयोजित करेल. लवकरच mcc.nic.in वर माहिती पुस्तिकेसह समुपदेशन फेरी आयोजित करण्याच्या तारखांची माहिती उपलब्ध होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी