NEET Topper Tanmay : डॉक्टर का लड़का डॉक्टर ही बनेगा! NEET मध्ये टॉप करणाऱ्या जन्मूच्या तन्मयला करायचंय AIIMS मध्ये वैद्यकीय शिक्षण

NEET Topper Tanmay:   दिल्लीचा विद्यार्थी तन्मय गुप्ताने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट  (National Eligibility cum Entrance Test ) (NEET) मध्ये ऑल इंडियामधून टॉपर रँक 1 मिळवली आहे.

NEET Topper Tanmay Want Medical education in AIIMS
NEET मधील टॉपर तन्मयला AIIMS मध्ये करायचंय वैद्यकीय शिक्षण  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • तन्मयला दिल्लीच्या एम्समधून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे.
  • दिल्लीतील डीपीएस आरके पुरम येथून 11वी आणि 12वी शिकलेल्या तन्मयचे आई-वडील जम्मू-काश्मीरमध्ये डॉक्टर आहेत.
  • दहावीपासूनच तन्मयने आपलं करिअरचा मार्ग निवडला होता.

NEET Topper Tanmay:  नवी दिल्ली : दिल्लीचा विद्यार्थी तन्मय गुप्ताने नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट  (National Eligibility cum Entrance Test ) (NEET) मध्ये ऑल इंडियामधून टॉपर रँक 1 मिळवली आहे. NEET मध्ये 3 विद्यार्थ्यांनी 1 क्रमांक मिळवला आहे. तन्मय 720 पैकी 720 गुण मिळवून NEET टॉपर ठरला. जम्मूचा रहिवासी असलेला तन्मय म्हणतो की, हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मी जम्मूबाहेर राहून २ वर्षे कठोर परिश्रम केले होते आणि अखेर मी ते साध्य केले आहे.

तन्मयला दिल्लीच्या एम्समधून वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. तो म्हणतो, सुरुवातीपासूनच एम्सला पहिली पसंती आहे, मला तिथे प्रवेश घ्यायचा आहे. दिल्लीतील डीपीएस आरके पुरम येथून 11वी आणि 12वी शिकलेल्या तन्मयचे आई-वडील जम्मू-काश्मीरमध्ये डॉक्टर आहेत. दहावीचा उत्कृष्ट निकाल पाहून त्याच्या पालकांनी स्पर्धात्मक अभ्यासाची तयारी करण्याच्या उद्देशाने त्याला दिल्लीला अभ्यासासाठी पाठवले.

तन्मय सांगतो, दहावीपासूनच मी मार्ग निश्चित केला होता की मला डॉक्टर बनायचे आहे आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करायची आहे.  2 वर्षे सतत अभ्यास करून मी माझे ध्येय साध्य केले. तन्मय सांगतो, सुरुवातीला मी १५-१६ तास अभ्यास करायचो आणि तरीही मला असं वाटत होतं की मी नीट तयारी करू शकत नाही. त्यावेळी माझ्या एका शिक्षकाने माझी अडचण समजून सांगितली आणि समजावून सांगितले की, अभ्यासाचे तासाने काही फरक पडत नाहीत, परंतु तुम्ही किती तास योग्य प्रयत्न करत आहात, हे महत्त्वाचे आहे.

यानंतर मला आत्मविश्वास आला की मी 8 तास नीट अभ्यास केला तरी ते माझे ध्येय साध्य करण्यासाठी पुरेसे आहे.  रोज अभ्यास करून, स्वतःवर जास्त ओझे न टाकता आणि टेन्शन न घेता अभ्यास केल्याने हे यश मिळाले असे मला वाटते. तो म्हणाला की, मी बोर्ड आणि नीटच्या तयारीसाठी योग्य समतोल बनवून ठेवला होता.  बोर्डाच्या शालेय शिक्षणावर लक्ष केंद्रित केले, त्यानंतर NEET च्या तयारीसाठी आकाश कोचिंगच्या शिक्षकांची मदत घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी