Savarkar Controversy: एका महिलेसाठी नेहरुंनी केली देशाची फाळणी, रणजीत सावरकरांचा गंभीर आरोप

राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंवर गंभीर आरोप केले आहेत. पंडित नेहरू एका महिलेसाठी भारताचं विभाजन करायला तयार झाले, असा आरोप सावरकर यांनी केला आहे.

Savarkar Controversy
सावरकरांच्या नातवाचे नेहरुंवर गंभीर आरोप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांचे पंडित नेहरूंवर गंभीर आरोप
  • एका महिलेसाठी देशाच्या फाळणीचा निर्णय नेहरुंनी घेतल्याचा दावा
  • राहुल गांधींना आरोपांची उत्तरं देण्याचं आव्हान

Savarkar Controversy: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (V.D. Savarkar) यांच्या माफीनाफ्याचे पत्र पत्रकार परिषदेत सादर केल्यानंतर आता यावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंवर गंभीर आरोप केले आहेत. पंडित नेहरू एका महिलेसाठी भारताचं विभाजन करायला तयार झाले, असा आरोप सावरकर यांनी केला आहे. त्याचप्रमाणे पंडित नेहरूंनी भारताबाबतची गुप्त माहिती 12 वर्षे इंग्रजांना दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. राहुल गांधींनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असं आव्हान त्यांनी दिलं आहे. 

काय आहेत आरोप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,”भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे एका महिलेसाठी भारताच्या फाळणीला तयार झाले. 12 वर्षे भारताबाबतची सगळी गुप्त माहिती ते ब्रिटीशांना देत होते. पंडित नेहरु आणि ॲडविना यांच्यातील इंग्रजीत झालेला पत्रकार मागवला जावा आणि तो सार्वजनिक केला जावा. ज्यांना सगळे प्रेमाने चाचा नेहरू म्हणतात, त्यांचं खरं रुप देशासमोर यावं.”

अधिक वाचा - श्रद्धाच्या पाठीवर जळती सिगरेट विझवायचा आफताब

पंडित नेहरु आणि ॲडविना

पंडित नेहरुंवर आरोप करताना रणजीत सावरकर पुढे म्हणतात, ”9 मे ते 12 मे 1947 या दरम्यान पंडित नेहरु हे शिमल्याला गेले होते. चार दिवस ते आपल्या कुटुंबीयांसह तिथे राहिले. आपण पंडित नेहरुंना अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं, असं ॲडविना यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ते फारच व्यस्त असल्यामुळे ‘नर्व्हस ब्रेक डाऊन’च्या अवस्थेला पोहोचले होते. त्यांनी माझ्यासोबत चार दिवस घालवले. तिथं आमची चांगली मैत्री झाली. ही मैत्री दीर्घकाळ चालेल. पंडित नेहरू हे आता आपल्या ताब्यात आले आहेत, असंही ॲडविनानं पत्रात लिहिलं होतं.”

व्हॉईसरॉय नेमण्यामागे नेहरूंचा हात

माउंटबॅटन यांना व्हॉईसरॉय म्हणून नेमण्यातही पंडित नेहरू यांचाच हात होता, असा आरोपही रणजीत सावरकर यांनी केला. ते म्हणाले, “व्हॉईसरॉय असल्यामुळे पाकिस्तानात सैन्य पाठवू शकत नाही, असं बळवंत सिंग यांनी म्हटलं होतं. 20 हजार भारतीय तरुणींचं अपहरण झालं होतं आणि त्यांना पाकिस्तानात नेण्यात आलं होतं. त्या वेळी सुरु असणारं हत्यासत्र आणि नरसंहार पाहून काय करावं, हे भारतीय नेत्यांना समजत नव्हतं, असं माउंटबॅटन यांनी लिहून ठेवलं आहे. माउंटबॅटन यांनी भारत सोडल्यानंतरही 12 वर्षं दररोज नेहरू त्यांना रिपोर्ट पाठवत असत. हे न समजणं ही भारतीय गुप्तचर यंत्रणांची मोठी चूक आणि मर्यादा होती.”

अधिक वाचा - टाटा सुमो दरीत कोसळली, 12 ठार

हनीट्रॅप

पंडित नेहरू यांना एक हनी ट्रॅपमध्ये फसवण्यात आलं आणि ते फसले, असा आरोप रणजीत सावरकर यांनी केला. राहुल गांधींनी बारा वर्षांच्या या हनीट्रॅपबद्दल माहिती द्यावी, अशी मागणीही सावरकर यांनी केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी