Parth Chattergy : चोरावर मोर! पार्थ चॅटर्जींच्या घरावर चोरांचा डल्ला, शेजाऱ्यांना वाटली ED ची धाड

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणात अडकलेले पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी हीदेखील ईडीचीच धाड असावी, असे समजून शेजारी शांत राहिले.

Parth Chattergy
पार्थ चॅटर्जींच्या घरावर चोरांचा डल्ला, शेजाऱ्यांना वाटली ED ची धाड  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पार्थ चॅटर्जी यांच्या घरावर चोरांचा डल्ला
  • शेजाऱ्यांच्या देखत लुटून नेली संपत्ती
  • शेजाऱ्यांना वाटले, ही तर ईडीची धाड!

Parth Chattergy : पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक भरती घोटाळाप्रकऱणी (Teacher recruitment scam) अडचणीत आलेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chattergy) यांच्या एका फ्लॅटमध्ये चोरी (Theft) झाल्याची घटना समोर आली आहे. पार्थ चॅटर्जी यांच्याकडे शिक्षक भरती घोटाळ्यात कोट्यवधी रुपये ईडीनं जप्त केले आहेत. चॅटर्जी यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावे समोर आल्यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं असून मंत्रिपदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या ईडीकडून त्यांचा जोरदार तपास सुरू आहे. त्यातच आणखी एका नव्या संकटाला त्यांना सामोरं जावं लागत असून या सगळ्या घाईगडबडीत चोरट्यांनीही आपला हात साफ करून घेतल्याचं दिसून आलं आहे. 

अशी झाली चोरी

पार्थ चॅटर्जी यांचं दक्षिण परगणा भागात एक घर आहे. बुधवारी या घरात चोरी झाली. चोर कुलूप तोडून घरात घुसले आणि त्यांनी मिळेल ते सामान गोण्यांमध्ये भरलं. यावेळी त्यांचे अनेक शेजारी बाहेरच होते आणि ही घटना घडताना प्रत्यक्ष पाहत होते. मात्र पार्थ चॅटर्जी यांची सध्या ईडी चौकशी सुरू असल्याचं सर्वांना माहित होतं. आत्तादेखील ईडीचे अधिकारीच पार्थ चॅटर्जींच्या घरावर धाड टाकत असावेत, असाच सर्वांचा समज झाला. चोरट्यांनी शांतपणे घरातील मौल्यवान सामान बाहेर आणून ते गोण्यांमध्ये भरलं आणि निघून गेले. मात्र कुणीही त्यांना कुठलाही प्रश्न विचारला नाही. 

अधिक वाचा - Court decision on Dog : मुलाच्या कुत्र्याचा आईला नाहक त्रास, कोर्टाने दिला ऐतिहासिक निर्णय

चोरट्यांच्या स्टाईलची चर्चा

राजकारणात सुरु असलेल्या घटनांचा कसा फायदा घ्यायचा, हे चोरट्यांकडे पाहून शिकावं, अशी चर्चा त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये रंगली होती. या चोरीची पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. मात्र शेजाऱ्यांना कुठलाही संशय येऊ न देता चोरट्यांनी सराईतपणे आणि सर्वांसमक्ष चोरी केली. 

पार्थ यांच्या अडचणीत वाढ

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पक्षाने सर्व पदांवरून त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांनीदेखील आता हात वर केले असून आपल्याकडे सापडलेली सर्व संपत्ती ही पार्थ चॅटर्जी यांची असल्याचा दावा केला आहे. 

अधिक वाचा- Tiger : भारतात १० वर्षांत १०५९ वाघांचा मृत्यू, देशात उरले २९६७ वाघ

धाडीत मिळाले होते कोट्यवधी रुपये

पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या अर्पिता मुखर्जी यांच्या दोन वेगवेगळ्या फ्लॅटवर ईडीनं धाडी टाकल्या होत्या. त्यापैकी पहिल्या धाडीत 20 कोटी रुपये तर दुसऱ्या धाडीत 51 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. दुसऱ्या धाडीत त्यांना तब्बल 5 किलो सोनंही सापडलं होतं. ही कॅश घेऊन जाण्यासाठी ईडीला 20 ट्रक बोलवावे लागले होते. त्याचप्रमाणे नोटा मोजण्यासाठी अतिरिक्त मशीन्स आणि त्या भरण्यासाठी अतिरिक्त गोण्याही मागवून घ्याव्या लागल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी