गंगा नदीतील पेटीत मिळाली नवजात मुलगी; आता योगी सरकार करणार गंगाचं पालन-पोषण

युपीच्या गाजीपूरमधील ददरी घाटावर एखाद्या चित्रपटासारखी घटना घडली आहे. येथील एका मच्छीमार नाविकाला गंगा नदीत एक पेटी सापडली आहे.

New born girl baby found in ganga river at ghazipur, yogi government will be Guardian
आता योगी सरकार करणार गंगाचं पालन-पोषण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • गाजीपूरच्या ददरी घाट परिसरातील गंगा नदीत तरंगत्या पेटीत मिळाली नवजात गंगा
  • पेटीत मुलीसोबत आहे फोटो आणि जन्मकुंडली
  • युपी सरकार नवजात मुलीचं करणार पालन-पोषण, सीएम योगी आदित्यनाथने दिले आदेश

नवी दिल्ली : युपीच्या गाजीपूरमधील ददरी घाटावर एखाद्या चित्रपटासारखी घटना घडली आहे. येथील एका मच्छीमार नाविकाला गंगा नदीत एक पेटी सापडली आहे. या पेटीत एक नवजात मुलगी मिळाल्याची माहिती योगी सरकार मिळाताच योगी सरकार त्या मुलीचं पालन-पोषण करण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे सर्व मच्छीमार आपली बोट हाकत होते. त्याच वेळेच एका नाविकाला लहान बाळ रडल्याचा आवाज येऊ लागला. तो सर्व किनाऱ्यावर पाहू लागला. पण त्याला कोणीच दिसले नाही. ज्या दिशेने रडण्याचा आवाज येत होता, तो नावाडी त्या दिशेने जाऊ लागला. त्या दिशेने जाताना रडण्याचा आवाज मोठा होऊ लागला. तो नावाडी अजून पुढे आला आणि समोर पाहतो तर काय त्याला एक पेटी दिसली. त्या लाकडी पेटीत एक नवजात मुलगी होती. त्या मुलीसोबत देवी - देवतांचे फोटो आणि जन्म कुंडली होती. या पेटीत गंगा असल्याचे नावाड्याला कळताच सर्व ददरी घाट परिसरात मोठी खळबळ माजली. 

दरम्यान या नावाड्याचं नाव गुल्लू चौधरी असून त्याने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. मंगळवारी सायंकाळी नदीच्या किनाऱ्यावर एका लाकडी पेटीत ही मुलगी मिळाल्याचं गुल्लू चौधरी यांनी सांगितलं. गावकऱयांना या पेटी मुलगी दिसताच सर्वजण अचंबित झाले. या पेटीत मुलीसह देवी- देवतांचा फोटो आणि कुंडली होती. 

गंगा नदीतील पेटीत मिळाली नवजात मुलगी

युपी सरकार बनणार गंगाचे आई-बाप

गाजीपूर जिल्ह्यातील गंगा नदीत एका पेटी नवजात मुलगी सापडल्याची माहिती योगी सरकारला देण्यात. ही माहिती युपी सरकारला मिळताच त्या मुलीचं पालन-पोषण सरकार करणार असल्याची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ म्हणाले की, ''नावाड्याने त्या मुलीला वाचवणं हे मानवतेचं उदाहरण आहे. राज्य सरकार त्याविषयी त्याचं आभार व्यक्त करत त्याला आवासाची सुविधा देणार आहे. यासह इतर योजनांचा लाभही त्या नावाड्याला देण्यात येणार आहे''. 

पेटीतील मुलगी पाहून नाविक झाला आश्चर्यचकित 

नाविक नावाडी पेटी उघडताच अंचबित झाला. कारण त्या पेटीत एक जिवंत मुलगी होती. त्या मुलीसोबत देवांचा फोटो आणि जन्म कुंडलीपण होती. कुंडलीवर त्या मुलीचे नाव गंगा लिहिले होते. ही माहिती होताच घाटावर नागरिकांची गर्दी जमू लागली. दरम्यान या मुलीचा जन्म फक्त तीन आठवडयाआधी झाला असल्याचं कुंडलीमधून समजलं. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी