लसीकरण सुरू, कॉलर ट्युनचा आवाज आणि संदेश बदलला

लसीकरणाची मोहीम सुरू होताच देशातील सर्व मोबाइलवर फोन केल्यानंतर वाजणारी सरकारी कॉलर ट्युन बदलली.

new caller tune on your phone says made in india vaccine is safe will provide immunity
लसीकरण सुरू, कॉलर ट्युनचा आवाज आणि संदेश बदलला 

थोडं पण कामाचं

  • लसीकरण सुरू, कॉलर ट्युनचा आवाज आणि संदेश बदलला
  • पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ
  • जाणून घ्या, कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रथम कोणाला लस देणार?

नवी दिल्ली: कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारतात लसीकरण सुरू झाले. लसीकरणाची मोहीम सुरू होताच देशातील सर्व मोबाइलवर फोन केल्यानंतर वाजणारी सरकारी कॉलर ट्युन बदलली. नव्या कॉलर ट्युनमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला (Jasleen Bhalla) यांचा आवाज आहे. (new caller tune on your phone says made in india vaccine is safe will provide immunity)

जसलीन भल्ला हिंदीत म्हणतात... 'नया साल कोविड-19 की वैक्सीन के रूप में नई आशा की किरण लेकर आया है। भारत में बनी वैक्सीन सुरक्षित और प्रभावी है। कोविड के विरुद्ध हमें प्रति-रोधक क्षमता देती है... भारतीय वैक्सीन पर भरोसा करें... अफवाहों पर भरोसा ना करें...।' ही कॉलर ट्युन हिंदी, मराठी, इंग्रजीसह वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे. 

याआधी जसलीन भल्ला आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या आवाजात कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती करण्यासाठी दोन स्वतंत्र कॉलर ट्युन तयार केल्या होत्या. कोणालाही फोन केल्यानंतर कोरोना संदर्भात जनजागृती करणारी अमिताभ अथवा जसलीन भल्ला यांच्या आवाजातील कॉलर ट्युन ऐकावी लागायची. जवळपास ३० सेकंदांची असलेली ही ट्युन ऐकल्याशिवाय कॉल करणे शक्य नव्हते. अनेक कंपन्यांनी काही दिवसांनंतर कॉलर थांबवण्याचा एक पर्याय दिला. 

कॉलर ट्युन वाजण्यास सुरुवात झाल्यावर एक आकड्याचे बटण दाबले तर कॉलर ट्युन वाजणे लगेच थांबायचे आणि कॉल लागायचा. पण अनेकांना कॉलर ट्युन ऐकण्याची सवय झाली होती. सोशल मीडियावर कॉलर ट्युनवरुन अनेक जोक आणि मीम्स व्हायरल झाले. 

देशात लसीकरण सुरू होताच सर्व मोबाइलवर फोन केल्यानंतर वाजणारी सरकारी कॉलर ट्युन बदलली. नव्या कॉलर ट्युनमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट जसलीन भल्ला (Jasleen Bhalla) यांचा आवाज आहे. लस घेतली तरी मास्क लावणे, सोशल डिस्टंस राखणे, वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे या बंधनांचे पालन करायचे आहे; याचीही आठवण जसलीन भल्ला कॉलर ट्युनमधून करुन देत आहेत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ

लस घेण्याचे आवाहन करणारी नवी कॉलर ट्युन सक्रीय झाल्याच्या काही तासांनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशात लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांमधील एकूण ३६०० केंद्रांवर लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने विकसित केलेला को-विन (Co-WIN) हा डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यात येणार आहे. या को-विन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसींचा एकूण साठा, पुरवठा, लस कोणाला दिली गेली, लसीचा दुसरा डोस पुन्हा कधी दिला जाणार यासारखी संपूर्ण माहिती उपलब्ध असणार आहे.

जगातील सर्वात मोठे लसीकरण

कोरोना आजारावर मात करण्यासाठी प्रथम कोणाला लस देणार?

  1. पहिल्या गटात शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा समावेश आहे.
  2. दुसऱ्या गटात फ्रंटलाईन वर्करचा समावेश आहे ज्यात केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधील कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक, महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
  3. तिसऱ्या गटात ५० वर्षांवरील आणि ज्यांना अन्य व्याधी आहेत अशा ५० वर्षांखालील व्यक्तींचा समावेश आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी