ट्विटरवर का ट्रेंड होतंय ‘बौद्धस्थळ अयोध्या’? जाणून घ्या

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2020 | 19:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

अयोध्येत राम मंदिर निर्माण कार्य सुरू होण्यापूर्वी आता नवीन वाद सुरू झालाय. जमीन समतोल करण्याचं काम सुरू असतांना मिळालेल्या अवशेषांवरून काही जण हे अवशेष सम्राट अशोकाच्या काळातले असल्याचं म्हणतायत.

ayodhya ram mandir
ट्विटरवर का ट्रेंड होतंय ‘बौद्धस्थळ अयोध्या’? जाणून घ्या वाद 

थोडं पण कामाचं

  • अयोध्येत राम मंदिर जमीन समतोल करण्याच्या कामात मिळालेल्या अवशेषांवरून नवीन वाद
  • ट्विटरवर हॅशटॅग बौद्धस्थळ अयोध्या होतंय ट्रेंड, लोकांनी यूनेस्कोला निष्पक्ष तपास करण्याची केली मागणी
  • लोकांचा दावा आहे की, अयोध्येत मिळालेले अवशेष बौद्ध धर्माशी निगडित आहेत. ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत

अयोध्या: राम मंदिर निर्मितीच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालंय. जमीन समतोल करण्याचं काम सुरू असतांना अनेक मूर्ती आणि प्राचीन अवशेष सापडले आहेत. मूर्त्यांचे अवशेष मिळाल्यानंतर ट्विटरवर नवीन वाद सुरू झाला आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरवर हॅशटॅग बौद्धस्थळ अयोध्या ट्रेंड करत आहे. इथं काही लोकांनी दावा केला आहे की, जमीन समतोल करतांना सापडलेले अवशेष मिळाले आहेत ते सम्राट अशोकाच्या शासनकाळातील दरम्यानचे आहे. काही ट्विटर युजर्सनी यूनेस्कोला रामजन्मभूमी परिसराचं निष्पक्ष खोदकाम करण्याची मागणी केलीय.

लोकांचं म्हणणं आहे की, जमीन समतोल करतांना खोदकामात अवशेष मिळाले आहेत, ते शिवलिंग नाही तर बौद्ध स्तंभ आहे. यासोबतच लोकांनी ट्विटरवर बौद्ध धर्मातील कलाकृती आणि अयोध्येत सापडलेल्या अवशेषांचा फोटो शेअर करत तुलना केली आहे. यापूर्वी ऑल इंडिया मिल्ली काऊंसिलचे महासचिव खालिक अहमद खान यांनी दावा केला होता की, जे अवशेष मिळाले आहेत, ते बौद्ध धर्माशी निगडित आहेत.

ट्रस्टनं सांगितलं मूर्त्या मिळाल्या, जिलानी म्हणाले प्रोपगंडा

जमीन समतोल करतांना मिळालेल्या अवशेषांना राम मंदिर ट्रस्टनं मंदिराचे अवशेष आणि भग्न मूर्त्या सांगितलं जातंय. तर मुस्लिम पक्षानं आपलं मत मांडत या मूर्त्या राम मंदिराचे अवशेष नसल्याचं म्हटलंय. यावर अयोध्या वादामध्ये सुन्नी वक्फ बोर्डचे वकील असलेले जफरयाब जिलानी यांनी म्हटलं की, हा एक प्रोपगंडा आहे. त्यांनी म्हटलं की, सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलंय की, एएसआयच्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होत नाही की, १३व्या शतकात इथं कोणतं मंदिर होतं.

बौद्ध अवशेष म्हणून २०१८मध्ये दाखल केली होती याचिका

खरंतर या प्रकरणामध्ये अयोध्येत राहणाऱ्या विनीत कुमार मौर्य यांनी २०१८ साली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. विनीत यांचा दावा होता की, वादग्रस्त स्थळाखाली काही अवशेष दबले गेले आहेत, जे सम्राट अशोकाच्या काळातील आहेत आणि याचा संबंध बौद्ध धर्मासोबत आहे. याचिकेमध्ये हा सुद्धा दावा केला गेला होता की, बाबरी मस्जिद निर्माण करण्यापूर्वी तिथं बौद्ध धर्माशी निगडित वास्तू होती. मौर्य यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं, ‘एएसआयच्या खोदकामात माहिती मिळते की, तिथं स्तूप, गोलाकार स्तूप, भिंत आणि खांब होते, जे कुठल्याही बौद्ध विहाराचं वैशिष्ट्य असतात.’ मौर्य यांनी पुढे असंही म्हटलं होतं की, ‘ज्या ५० खड्ड्यांमध्ये खोदकाम झालं होतं, तिथं कुठल्याही मंदिर किंवा हिंदू मंदिराचे अवशेष मिळाले नाहीत.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी