Crime News: दारूड्याचा मंदिरात घुसून हैदोस, हनुमानाच्या मूर्तीची विटंबना; CCTV कॅमेऱ्यात धक्कादायक घटना कैद

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 22, 2022 | 12:01 IST

Delhi Crime News: प्रत्यक्षात मूर्तीची विटंबना करतानाची ही घटना मंदिराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Hanuman idol
दारू पिऊन मंदिरात घुसून हैदोस 
थोडं पण कामाचं
  • मंदिरात एका व्यक्तीनं दारू पिऊन (drunk alcohol) धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे.
  • याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
  • प्रत्यक्षात मूर्तीची विटंबना करतानाची ही घटना मंदिराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

नवी दिल्ली: Man enters temple after drinking alcohol: एक धक्कादायक बातमी समोर येतेय. राजधानी दिल्लीतील (Delhi)  महेंद्र पार्क (Mahendra Park) परिसरात असलेल्या मंदिरात एका व्यक्तीनं दारू पिऊन (drunk alcohol)  धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे या व्यक्तीनं मंदिरात हनुमानाची मूर्तीची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षात मूर्तीची विटंबना करतानाची ही घटना मंदिराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती काठी घेऊन मंदिरात जातो आणि हनुमानाची मूर्तीची विटंबना करण्यास सुरुवात करतो. यानंतर त्यांनी मंदिराजवळील काही दुकानांची तोडफोडही केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री उशिरा घडला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

अधिक वाचा- Sonalee Kulkarniच्या सर्वात जवळच्या व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप, शेअर केला इमोनशल Video

रविवारी जेव्हा स्थानिक लोक मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना हनुमानाची मूर्तीची विटंबना झालेली दिसली. यासोबतच काही दुकानांची तोडफोडही करण्यात आली होती. यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंदिराजवळ लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासल्यावर एक व्यक्ती काठीनं मंदिरात आणि दुकानांची तोडफोड करत असल्याचं त्यांना दिसलं. 

पोलिसांनी सांगितलं की, हा व्यक्ती दारूच्या नशेत होता. यामुळे त्यांनी मंदिर आणि दुकानाची तोडफोड केली असावी असा अंदाज आहे. दरम्यान पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

अधिक वाचा- 'या' 3 राशींच्या सोनेरी दिवसांना सुरूवात, चालून येतील अनेक संधी

काही स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली की, ज्या व्यक्तीने तोडफोड केली आहे, त्याला अंमली पदार्थांचे व्यसन आहे. दिवसभर तो दारू पिऊन असेच प्रकार करत राहतो. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, सध्या मंदिरात हनुमानाची नवीन मूर्ती बसवण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी