Rahul Attacks Centre: नवी दिल्ली : काँग्रेस नेते (Congress leader) आणि केरळमधील (Kerala) वायनाडचे (Wayanad) खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) महागाई (Inflation) आणि रोजगाराच्या (Employment) मुद्द्यावरून केंद्रावर (Centre) सातत्याने निशाणा साधतात. त्यांनी आज पुन्हा एकदा न्यू इंडियावर टोमणा मारत बेरोजगारीबाबत केंद्र सरकारवर (Central Government) जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी मंगळवारी ट्विट केले की, 'न्यू इंडियाचा नवा नारा- हर घर बेरोजगारी, घर घर बेरोजगारी.' या ट्विटमध्ये राहुलने पुढे लिहिले- 'मोदी जी 75 वर्षातील देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांच्या 'मास्टरस्ट्रोक'मुळे 45 कोटींहून अधिक लोकांनी नोकरी मिळण्याचं स्वप्न सोडून दिलं आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही बेरोजगारी आणि महागाईबाबत केंद्रावर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट करून म्हटले- 'मोदी सरकारमध्ये लोकांची रोजी-रोटी हिरावून घेतली नाही, तर करोडो आशाही मिटल्या आहेत. 90 कोटींपैकी 45 कोटी लोकांनी थकून नोकरी शोधणे सोडून दिले. अर्थव्यवस्थेतील 'अर्ध्या लोकसंख्येचा' सहभाग 18% वर आला आहे. अमृत काळात देशाला बेरोजगारी आणि महागाईचे विष प्यावे लागत आहे.
तत्पूर्वी, राहुल यांनी एफडी आणि महागाई दरावरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. महागाई दर आणि घटते मुदत ठेव किंवा एफडी व्याज दर पाहिल्यानंतर राहुल गांधी म्हणाले होते की, पीएम मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक'ने तुमच्या कष्टाने कमावलेला पैसादेखील नष्ट झाला आहे. राहुल गांधी म्हणाले होते- "महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर गेला आहे, तर FD व्याजदर 5 टक्क्यांवर आला आहे. तुमच्या बँक खात्यात 15 लाख जमा करणे विसरून जा, PM मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक'ने तुमचा कष्टाचा पैसादेखील नष्ट केला आहे." राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2022 मध्ये 2 लाख रुपये फिक्स (निश्चित) केल्यास 11,437 रुपये मिळतात तर 2012 मध्ये 19,152 रुपये मिळत होते. यावरुन राहुल गांधींनी याला जन धन लूट योजना म्हटले आहे.
हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारानंतर जहांगीरपुरीतील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले होते, "हे लोक संविधानिक मूल्ये नष्ट करत आहेत. हे सरकार गरीब आणि अल्पसंख्याकांना प्रायोजित लक्ष्य करत आहे. भाजपने घरे उद्धवस्त करण्याऐवजी त्यांच्या मनातील द्वेष काढून टाकला पाहिजे.
.