Bike Blast : नवी बुलेट घेऊन पुजा करण्यासाठी पोहोचला मंदिरात, गाडीचा झाला भीषण स्फोट

गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे अनेक घटना समोर आल्या होत्या. आता सुप्रसिद्ध बाईक रॉयल एनफील्डमध्ये आग लागली आहे. पहक्त आगच नव्हे तर या गाडीचा स्फोट झाल आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

karnatak bike blast
कर्नाटक बाईक स्फोट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे अनेक घटना समोर आल्या होत्या.
  • आता सुप्रसिद्ध बाईक रॉयल एनफील्डमध्ये आग लागली आहे.
  • फक्त आगच नव्हे तर या गाडीचा स्फोट झाला आहे.

Bike Blast : बेंगळुरू : गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याचे अनेक घटना समोर आल्या होत्या. आता सुप्रसिद्ध बाईक रॉयल एनफील्डमध्ये आग लागली आहे. फक्त आगच नव्हे तर या गाडीचा स्फोट झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकातील म्हैसूर भागात राहणार्‍या रविचंद्र यांनी एक नवीन रॉयल एनफील्ड बाईक घेतली होती. या गाडीची पुजा करण्यासाठी ते कासापुरम येथील आंजनेय स्वामी मंदिरात पोहोचले. इथे रविंद्रन यांनी गाडी पार्क केली आणि पुजेच्या तयारीला लागले. नंतर बाईकमधून धुर निघायला लागला आणि गाडीने अचानक पेट घेतला. त्यानंतर या गाडीचा भीष स्फोट झाला. तेव्हा आजूबाजूचे लोक घाबरून गेले. नंतर या स्फोटामुळे आजुबाजुच्या गाड्यांनाही आग लागली. 


पुण्यात इलेक्ट्रिक स्कूटरला आग

सध्या सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला आहे. पेट्रोल डिझेल महाग होत असल्याने ग्राहकांचा कल या इलेक्ट्रिक वेहिकलकडे आहे. सरकारकडूनही या इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच या गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल ऐवजी वीज लागत असल्याने या गाड्यांमुळे प्रदुषण होत नाही. असे असले तरी या गाड्यांचे काही दुष्परिणाम समोर येत आहे. ओलाने नुकतंच आपली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणली होती. या गाडीसाठी जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झाले तेव्हा ओलाची साईट डाऊन झाली होती. आता ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे ग्राहकांमध्ये एकच भिती पसरली आहे. ओला कंपनीने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. कंपनीने जारी केलेल्या सूचनेनुसार हा व्हिडीओ कंपनीच्या निदर्शनास आल्याचे म्हटले आहे. या घटनेचा तपास केला जाईल. तसेच ग्राहकांची सुरक्षिता आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 

भारतीय हवामानाला अनुकूल बॅटरी

इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी एथर एनर्जीने या घटनांचे विश्लेषण केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे प्रमुख कारण त्यातील बॅटरी आहे असे या कंपनीने म्हटले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ज्या बॅटरीज आहेत त्या थंड हवामान असलेल्या देशांसाठी बनवलेल्या आहेत. अनेक इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरसाठी लागणार्‍या बॅटरीज या परदेशातून आयात केल्या आहेत. या बॅटरी भारतीय हवामानानुसार बनवल्या पाहिजेत असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. 
  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी