UGC चा नवा नियम…, आता डिग्री कोर्ससाठी लागणार चार वर्षे

UGC: पुढील वर्षी बीए, बीएससी किंवा बीकॉम या पदवीपूर्व अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. यूजीसी पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत बदल करणार आहे. यूजीसीचा निर्णय देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये लागू होणार आहे.

थोडं पण कामाचं
  • यूजीसी पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत बदल
  • बीए, बीएस्सी किंवा बीकॉमचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार
  • अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये लागू असेल

मुंबई : आतापर्यंत BA, B.Sc किंवा B.Com केलेल्यांना तीन वर्षात पदवी मिळत असे. पणा आता आगामी शैक्षणिक वर्षापासून पदवीच्या अभ्यासक्रमासाठी चार वर्षे लागणार आहे. वास्तविक, UGC ने चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची (FYUP) रूपरेषा तयार केली आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये सर्व विद्यापीठांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. (New rule of UGC…, four years for degree course now)

अधिक वाचा : Shocking ! एकाच कुटुंबातील सहा जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की सामूहिक आत्महत्या?

पदवी अभ्यासक्रमाच्या कालावधीत करण्यात आलेला बदल देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये लागू होईल. केंद्रीय विद्यापीठांसह बहुतांश राज्यस्तरीय आणि खासगी विद्यापीठेही चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम राबवणार आहेत. अहवालानुसार, देशातील अनेक डीम्ड युनिव्हर्सिटीही ते स्वीकारण्यास तयार आहेत.

अधिक वाचा : श्रद्धा मर्डर केसची पुनरावृत्ती, आझमगडमध्ये आराधनाची हत्या; प्रिन्सला अटक

वर्षभराच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही चार वर्षांचा अभ्यासक्रम स्वीकारण्याची सुविधा दिली जाईल. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांच्या मते, 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची संपूर्ण योजना लवकरच सार्वजनिक केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी