Welcome 2022 : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगातील अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत

Happy New Year 2022 : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगातील अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडमधील ऑकलंड येथून झाली. ऑकलंडमध्ये नागरिकांनी उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत केले.

Happy New Year 2022
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगातील अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत 
थोडं पण कामाचं
  • ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगातील अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत
  • नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडमधील ऑकलंड येथून झाली
  • नागरिकांनी उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत केले

Happy New Year 2022 : नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह जगातील अनेक देशांमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत झाले. नव्या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडमधील ऑकलंड येथून झाली. ऑकलंडमध्ये नागरिकांनी उत्साहाने नव्या वर्षाचे स्वागत केले. आतषबाजी करुन आणि प्रमुख इमारतींवर आकर्षक रोषणाई करुन ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. 

दरवर्षी न्यूझीलंडमध्ये ऑकलंड आणि ऑस्ट्रेलियात सिडनी येथे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी विशेष रोषणाई आणि आतषबाजीची व्यवस्था केली जाते. ऑकलंड आणि सिडनीत नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात होते. या जल्लोषाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागतात. थोड्याच वेळात जगातील इतर देशांमध्येही नव्या वर्षाचे स्वागत होते आणि तिथले व्हिडीओ पण व्हायरल होऊ लागतात. नव्या वर्षाचे स्वागत सर्वात शेवटी अमेरिकेतील काही बेटांवर होते. 

ओमायक्रॉन आणि कोरोना संकट सुरू असले तरी कोविड प्रोटोकॉल पाळत जगात अनेक ठिकाणी नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. नव्या वर्षात महामारीचे संकट लवकर दूर होईल आणि पुन्हा एकदा सर्वजण आनंदाने राहू शकतील अशी आशा व्यक्त करत अनेकांनी एकमेकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी