गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने होते प्रदूषण, शेतकऱ्यांवर लागू होणार टॅक्स

new zealand new law farmers will have to pay tax on the belching of cow or other cattle : गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने वातावरणात मिथेन वायू फेकला जातो. यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.

new zealand new law farmers will have to pay tax on the belching of cow or other cattle
गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने होते प्रदूषण, शेतकऱ्यांवर लागू होणार टॅक्स  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने होते प्रदूषण, शेतकऱ्यांवर लागू होणार टॅक्स
  • गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने वातावरणात मिथेन वायू फेकला जातो
  • मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे

new zealand new law farmers will have to pay tax on the belching of cow or other cattle : गोवंशातील प्राण्यांनी ढेकर दिल्याने वातावरणात मिथेन वायू फेकला जातो. यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारला कराव्या लागणाऱ्या खर्चात वाढ होत आहे. यामुळे सरकारने शेतकऱ्यांवर कर लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास कर २०२५ पासून लागू होणार आहे. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा कर लागू होणार आहे. हा कर न्यूझीलंड या देशात लागू होणार आहे.

न्यूझीलंड या देशाची लोकसंख्या ५१ लाख आहे. पण या देशात गोवंशातील प्राणी, शेळ्या-मेंढ्या अशा उपयुक्त जनावरांची संख्या सुमारे एक कोटी आहे. यामुळे न्यूझीलंड सरकारने प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून नवा कर लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

नव्या करातून होणाऱ्या उत्पन्नाचा वापर कृषी संशोधन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना, शेतीचे आधुनिकीकरण, शेतीशी संबंधित लहान-मोठे उद्योग यात प्रामुख्याने करणार असल्याचे संकेत न्यूझीलंड सरकारने दिले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी