वाढत्या कोरोनामुळे PMनी घेतला मोठा निर्णय

new zealand pm jacinda ardern cancelled her wedding over restrictions for covid19 omicron outbreak : वाढत्या कोरोना संकटामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नाचा सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले.

new zealand pm jacinda ardern cancelled her wedding
वाढत्या कोरोनामुळे PMनी घेतला मोठा निर्णय 
थोडं पण कामाचं
  • वाढत्या कोरोनामुळे PMनी घेतला मोठा निर्णय
  • न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नाचा सोहळा रद्द केला
  • न्यूझीलंडमध्ये किती आहेत कोरोना Active रुग्ण?

new zealand pm jacinda ardern cancelled her wedding over restrictions for covid19 omicron outbreak : वेलिंग्टन : वाढत्या कोरोना संकटामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यांच्या स्वतःच्या लग्नाचा सोहळा रद्द केल्याचे जाहीर केले. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी न्यूझीलंडमध्ये मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे. नागरिकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेकडून लेखी परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांनाही मर्यादीत संख्येने नागरिकांना उपस्थित राहता येईल. या नागरिकांना मास्क सक्ती तसेच सोशल डिस्टंस राखण्याच्या बंधनाचे पालन करावे लागेल.

न्यूझीलंडमध्ये ऑकलंड येथे एक लग्नाचा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित असलेले एक कुटुंब विमानाने साऊथ आइसलँड येथे परतले. यानंतर कुटुंबातील सदस्य आणि विमानातील क्रू अशा नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यानंतर न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल कठोर करण्याचा निर्णय झाला.

न्यूझीलंडमध्ये नव्या नियमांनुसार बार, रेस्टॉरंट, लग्नाचा सोहळा या ठिकाणी एकावेळी जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीलाच परवानगी आहे. उपस्थित असलेल्यांपैकी बहुसंख्यांकांकडे 'वॅक्सिन पास' नसेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त २५ जणांच्या उपस्थितीलाच परवानगी असेल. 

न्यूझीलंडमध्ये विदेशी नागरिकांना मार्च २०२० पासून प्रवेशबंदी आहे. विशेष परिस्थितीत न्यूझीलंड सरकारच्या परवानगीने विदेशी नागरिक न्यूझीलंडमध्ये येऊ शकतात. एरवी विदेशींना देशात प्रवेश देणे थांबविण्यात आले आहे. न्यूझीलंडमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ९४ टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी ५६ टक्के नागरिकांना बूस्टर डोस टोचण्यात आला आहे. 

न्यूझीलंडची लोकसंख्या ५० लाख २ हजार १०० आहे. आतापर्यंत न्यूझीलंडमध्ये १५ हजार ५५० कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी १४ हजार ४०२ जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे न्यूझीलंडमध्ये ५२ मृत्यू झाले आहेत. न्यूझीलंडमध्ये १०९६ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पण हे संकट आणखी वाढू नये यासाठी न्यूझीलंड सरकार खबरदारी घेत आहे.

कोण आहेत जेसिंडा अर्डन?

जेसिंडा अर्डन न्यूझीलंडच्या पंतप्रधान आहेत. न्यूझीलंडच्या सर्वात लहान वयात झालेल्या पंतप्रधान असा विक्रम त्यांनी केला आहे. अर्डन सध्या चाळीशीच्या आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये निवडणुकीत विजय मिळवून अर्डन पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांनी २०१९ मध्येच टीव्ही होस्ट क्लार्क गेफोर्ड यांच्यासोबत एंगेजमेंट अर्थात साखरपुडा केला आहे. पण कोरोना संकटामुळे अर्डन यांनी लग्न लांबणीवर टाकले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी