Cigarrete Ban | वेलिंग्टन : सिगारेट (Cigarrete) हे उत्पादन जगभर मोठ्या धडाक्याने विकले जाणारे उत्पादन आहे. सिगारेटमुळे आरोग्याला होणारे अपाय (Effect of Cigarrete on health), त्यामुळे होणारे विविध आजार याविषयी नेहमीच चर्चा होत असते. मात्र सिगारेट खप काही कमी होत नाही. अशा परिस्थितीत न्यूझीलंडने (New Zealand)यासंदर्भात कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे. तंबाखू उद्योगावर सर्वात कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. न्यूझीलंड सरकारने (New Zealand to ban cigarrete) तरुणांना सिगारेट विकत घेण्यावर प्रतिबंध लावण्याची योजना बनवली आहे. सरकारचे यावर म्हणणे आहे की धूम्रपान कमी करण्यासाठीच्या इतर प्रयत्नांना खूप जास्त वेळ लागतो आहे. न्यूझीलंडमध्ये १४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना २०२७ पासून कधीही सिगारेट विकत घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. सरकारचे उद्दिष्ट तंबाखूची विक्री आणि सर्वच उत्पादनांमधील निकोटीनच्या पातळीत घट करण्याचे आहे. (New Zealand to ban cigarrete & tobaco products)
न्यूझीलंडचे असोसिएट आरोग्यमंत्री आयशा वेरालने यांनी म्हटले आहे की तरुणांनी धूम्रपान करू नये याची आम्हाला खातरजमा करायची आहे. यासाठी तरुणांना सिगारेट किंवा तंबाखूच्या उत्पादनांची विक्री करणे किंवा साठा करून ठेवणे याला गुन्हा ठरवले जाणार आहे. जर अशी कठोर पावले उचलली नाहीत तर धूम्रपानाचा दर ५ टक्क्यांनी कमी होत धूम्रपान नियंत्रणात येण्यास दशके लागतील. सरकार लोकांना या परिस्थितीवर सोडण्यास तयार नाही. म्हणून ही पावले उचलली जाणार आहेत.
सरकारी आकडेवारीनुसार सद्यपरिस्थितीत न्यूझीलंडम्ये १५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्व ११.६ टक्के तरुण धूम्रपान करतात. तर वयस्कांमध्ये हाच आकडा २९ टक्क्यांपर्यत वाढत जातो. २०२२च्या अखेरीपर्यत धूम्रपानासंदर्भात कायदा बनवण्यासाठी सरकार पुढील वर्षी जून मध्ये संसदेत विधेयक सादर करणार आहे. मात्र त्याआधी सरकार आगामी महिन्यांमध्ये चर्चा करणार आहे.
न्यूझीलंड सरकार निर्बंधांना २०२४ मध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहे. याची सुरूवात अधिकृत विक्रेत्यांच्या संख्येत वेगाने घट होण्याने होणार आहे. यानंतर २०२५ मध्ये निकोटीनची आवश्यकता घटणार आहे आणि २०२७ मध्ये धूम्रपान मुक्त पिढीची निर्मिती करणार आहे. न्यूझीलंड सरकारने म्हटले की सध्याच्या उपायांनी म्हणजे पॅकेजिंग आणि विक्रीवर टॅक्स आकारल्याने तंबाखूची विक्री घटली आहे. २०२५ पर्यत रोज ५ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्येने धूम्रपान करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कठोर पावलांची गरज होती.
न्यूझीलंडमध्ये दरवर्षी धूम्रपानामुळे जवळपास ५,००० लोकांना जीव गमवावा लागतो. यामुळे सरकारचे उद्दिष्ट हे प्रमाण कमी करण्याचे आहे. १८ वर्षांच्या वयापेक्षा कमी वयातील पाचपैकी चार मुले पहिल्यापासून धूम्रपानास सुरूवात करतात. त्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणात या विळख्यात अडकली आहे. सरकारने त्यामुळेच कठोर भूमिका घेतली आहे. तंबाखू विक्रेत्यांनी सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे.