Married Couple Beaten : लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याला प्रेमाने दिलं आमंत्रण, पोहोचताच केली जीवघेणी मारहाण, एकाचा मृत्यू

आपल्या मुलीने आपल्या मनाविरुद्ध लग्न केल्याचा इतका राग कुटुंबीयांना आला की त्यांनी मुलीला आणि तिच्या पतीला बेदम माराहण केली. यात तिच्या पतीचा मृत्यू झाला.

Married Couple Beaten
लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याला जीवघेणी मारहाण  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलीने प्रेमविवाह केल्याचा आला राग
  • दोघांना घरी बोलावून केली मारहाण
  • मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Married Couple Beaten : घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करणाऱ्या जोडप्याला गोड बोलून आमंत्रण (Invitation) दिले आणि त्यानंतर त्यांना जीवघेणी मारहाण (Beaten to death) केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या मुलीनं एका तरुणासोबत आपल्या इच्छेविरुद्ध लग्न (Love Marriage) केल्याची बाब कुटुंबीयांना सहन होत नव्हती.त्यासाठी आपल्या मुलीला आणि जावयाला धडा शिकवण्याचा डाव त्यांनी आखला होता. त्यानुसार एक दिवस आपल्याला हे लग्न मान्य असल्याचं सांगत त्यांनी मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर अगोदरपासूनच बेदम मारहाण करण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांनी त्यांना जोरदार मारहाण केली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. 

अशी घडली घटना

बिहारच्या सीतामढी परिसरात राहणाऱ्या राजू रामचं त्याच्या शेजारील गावातील एका मुलीवर जीवापाड प्रेम होतं. दोघंही सतत एकमेकांना भेटत असत आणि लग्न करण्याचा विचार करत. आपल्या घरच्यांना हे लग्न मान्य असेल का, याविषयीही त्यांच्या मनात शंका होती. मात्र तरीही त्यांनी आपापल्या घरी याविषयी थेट सांगण्याचा निर्णय घेतला होता. घरच्यांनी होकार दिला तर त्यांच्या सहमतीने आणि नकार दिला तर घर सोडून लग्न करण्याचा निर्णय दोघांनी मनोमन घेतला होता.

घरच्यांनी दिला नकार

दोघांनीही आपापल्या घरी आपल्या प्रेमप्रकरणाची कल्पना दिली. सुमारे अडीच ते तीन वर्षांपासून आपण एकमेकांच्या संपर्कात असून आपल्याला लग्न करण्याची इच्छा असल्याचं त्यांनी घरी सांगितलं. मात्र दोघांच्याही घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यानंतर राजू राम आणि त्याच्या प्रेयसीनं पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा - Shashi Tharoor : शशी थरूर लढवणार काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक, सुत्रांची माहिती

मुलीच्या कुटुंबीयांनी केली मारहाण

लव्ह मॅरेज करून काही आठवडे घराबाहेर काढल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांशी संपर्क साधला आणि आपल्याला हे लग्न मान्य असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांनाही घरी बोलावलं आणि पाहुणचारासाठी येण्याची विनंती केली. त्यानुसार दोघंही घरी पोहोचल्यानंतर अगोदरपासूनच लाठ्याकाठ्या घेऊन तयार असलेल्या मंडळींनी त्यांच्यावर अमानूष हल्ला केला. यात दोघंही गंभीर जखमी झाले. या दोघांना जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून देऊन मुलीच्या माहेरची मंडळी तिथून पळून गेली. 

तरुणाचा मृत्यू

काही नागरिकांनी मुलाच्या कुटुंबीयांना या घटनेची कल्पना दिली आणि तो आपल्या पत्नीसह रस्त्यावर पडल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तरुणाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तरुणी या मारहाणीतून बचावली आहे. आपला पती आता या जगात नाही, यावर तिचा विश्वासही बसत नाही. तर मुलाच्या आईवडिलांसाठी आभाळच फाटले असून मुलाचा विरह त्यांना सहन होत नाही.

अधिक वाचा - Honeytrap Case : सेक्स करण्यापूर्वी आधार पॅन बघण्याची गरज नाही,  कोर्टाकडून आरोपीला जामीन मंजूर

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर कडक कायदेेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी