न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या, पाहा कुठं घडला हा प्रकार

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 10, 2019 | 11:12 IST | टाइम्स नाऊ हिंदी

एका न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली असून सर्वांनाच एक धक्का बसला आहे.

News Anchor shot dead in Pakistan
पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या (प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • गोळ्या झाडून पत्रकाराची हत्या
  • न्यूज अँकर सोबतच त्याच्या मित्रावरही गोळीबार
  • गोळीबारात न्यूज अँकर आणि त्याच्या मित्राचाही मृत्यू

कराची: पाकिस्तानात न्यूज चॅनलमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराची मंगळवार संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कराची शहरातील ख्याबन-ए-बुखारी परिसरात एका स्थानिक कॅफेच्या बाहेर न्यूज अँकर मुरीद अब्बास यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात मुरीद अब्बास या न्यूज अँकरचा मृत्यू झाला आहे. मुरीद अब्बास हे बोल न्यूज सोबत काम करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी सांगितले की, आरोपीने एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून मुरीद अब्बास याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपीची ओळख आतिफ जमान नावाने झाली आहे.

पाकिस्तानातील मीडियाने दक्षिण डीआयजी शारजील खरलच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, अब्बास याच्या मित्रांनी सांगितले की त्याचा पैशांच्या देवाण-घेवणीवरुन काहींसोबत वाद सुरू होता. जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल सेंटर (जेपीएमसी) चे कार्यकारी निर्देशक सीमिन जमाली यांनी सांगितले की, अँकर अब्बास याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं, त्याच्या छाती आणि पोटावर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. या गोळीबारात अँकर अब्बासचा मित्र खिजार हयात याला सुद्धा गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा अधिकाऱ्यांनी बंदूकधारी आरोपीला पकडलं आहे. आरोपी हा आल्या घरात आत्महत्येचा प्रयत्न करत होता. आरोपीने स्वत:च्या छातीत गोळी मारली होती. जखमी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती डीआयजी शारजील खरल यांनी दिली आहे.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत सिंधचे पोलीस महानिरीक्षक (IGP) कलीम इमाम यांनी या प्रकरणी संबंधित उप महानिरीक्षक (DIG) यांना या प्रकरणी एक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनास्थळावरुन ताब्यात घेण्यात आलेल्या वस्तू, पुरावे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचे आदेश आयजीपी कलीम इमाम यांनी दिले आहेत.

यापूर्वी सुद्धा पाकिस्तानमध्ये अनेक पत्रकारांची हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सेना आणि गुप्तचर संस्था आयएसआयवर टीका केल्याने २२ वर्षीय पाकिस्तानी ब्लॉगर, पत्रकाराची हत्या करण्यात आली होती. अज्ञात इसमांनी त्याची हत्या केली होती. पत्रकार मोहम्मद बिलाल खान आपल्या मित्रासोबत जात होता त्यावेळी त्याला एक फोन कॉल आला आणि त्यानंतर एका व्यक्तीने त्याला जंगलात नेलं. मोहम्मद बिलाल खान याचे ट्विटरवर १६,०००, यू-ट्यूबवर ४८,००० आणि फेसबुकवर २२,००० फॉलोअर्स आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या, पाहा कुठं घडला हा प्रकार Description: एका न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली असून सर्वांनाच एक धक्का बसला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles