मुंबईत एनआयएची मोठी अॅक्शन: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांवर NIAची कारवाई; नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबईतील (Mumbai) हस्तकांवर एनआयएने (NIA) आज पहाटे कारवाई केली. दाऊदच्या डी गँगशी संबंधित २० हून अधिक ठिकाणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

NIA action against underworld don
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांवर NIAची कारवाई   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर छापे
  • मुंबईत डी गँग पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती.
  • दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले

मुंबई :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) मुंबईतील (Mumbai) हस्तकांवर एनआयएने (NIA) आज पहाटे कारवाई केली. दाऊदच्या डी गँगशी संबंधित २० हून अधिक ठिकाणी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मुंबईत डी गँग पुन्हा सक्रिय होत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवरच एनआयएने ही कारवाई केल्याची माहिती आहे.

एनआयएने सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली. भेंडीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, भिवंडी, सांताक्रुझ येथील एकूण २० ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित ड्रग्ज पेडलर्स, हवाला ऑपरेटर्स आणि शार्प शुटर्सच्या मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईतून आता एनआयएच्या हाती काय लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने फेब्रुवारी महिन्यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एनआयए सातत्याने दाऊदशी संबंधित मालमत्तांवर कारवाई करताना दिसत आहे. आजची कारवाईही त्याचाच एक भाग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊद गँग मुंबईत पुन्हा सक्रिय झाली होती. त्यांच्याकडून देशातील काही प्रमुख व्यक्तींना इजा किंवा घातपात करण्याचा कट आखण्यात आल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी