NIA raid: महाराष्ट्रासह ६ राज्यांत १३ ठिकाणी NIA कडून छापेमारी; कोल्हापूर, नांदेडमध्येही छापे, ISIS कनेक्शन प्रकरणात कारवाई

NIA raids in 6 states including Maharashtra: एनआयएकडून देशभरातील ६ राज्यांत धाड टाकण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्यांचाही समावेश आहे. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • एनआयएकडून देशभरातील सहा राज्यांत छापेमारी
  • आयसीस कनेक्शन प्रकरणात एनआयएकडून धाडसत्र
  • महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेडमध्ये छापे

NIA conducts searches in 6 states: आयसीस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. देशभरातील सहा राज्यांत एनआयएकडून कारवाई सुरू आहे. सहा राज्यांत एकूण १३ ठिकाणी एनआयएकडून छापा टाकून झाडाझडती घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (NIA conducts searches at 13 premises of suspects in 6 states in connection of ISIS activities)

मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांचा संबंध आयसीस सोबत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून एनआयएची टीम या संदर्भात तपास करत होती आणि अखेर देशभरातील ६ राज्यांत छापेमारी करण्यात आली आहे. आयसीस मॉड्यूल संदर्भात एनआयएला गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांना या धाडसत्रात काही महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आढळून आल्या आहेत. तसेच काही सेन्सेटिव्ह माहितीही एनआयएला तपासात आढळून आली आहे.

या प्रकरणी काही जणांना एनआयएने ताब्यात सुद्धा घेतल्याचं वृत्त असून त्यांच्या चौकशीनंतर अटकेची कारवाई केली जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची एनआयएकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

१५ ऑगस्टपूर्वी एनआयएने केलेली ही एक मोठी कारवाई आहे. या धाडसत्राच्या संदर्बात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत कुठलीही माहिती दिली नव्हती अशीही माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : Pakistan Hacking: पाकिस्तान अन् चीनचे वाजले बारा; भारत समर्थक हॅकर्सनी उडवल्या लष्कराच्या 15000 फाईल्स

कोणत्या ६ राज्यांत छापेमारी? 

एनआयएकडून करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या सहा राज्यांतील एकूण १३ ठिकाणी ही छापेमारी सुरू करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशातून एकजण ताब्यात

उत्तरप्रदेशातील सहारनपूरमध्ये रविवारी सकाळी एनआयए आणि उत्तरप्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. या छापेमारी दरम्यान देवबंद येथून एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित तरुण हा मदरशाचा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून आयसीस मॉड्यूलच्या संपर्कात असल्याचीही माहिती समोर आली आहे. आयसीसच्या संपर्कात असलेला हा तरुण एनआयएच्या रडारवर होता. आज एनआयएने छापेमारी करत त्याला ताब्यात घेतले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी