महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये NIA चे छापे

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 20, 2019 | 13:39 IST | टाइम्स नाऊ हिंदी

NIAच्या पथकाने हैदराबाद आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

NIA raid wardha maharashtra hyderabad
महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये NIA चे छापे   |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: राष्ट्रीय तपस यंत्रणा (एनआयए) च्या टीमने हैदराबाद आणि महाराष्ट्रातील वर्धा येथे छापेमारी केली आहे. दहशतवादाच्या संशयावरुन एनआयएने ही छापेमारी केली आहे. हैदराबादमधील तीन जागांवर तर महाराष्ट्रातील वर्ध्यात एनआयएच्या टीने छापे टाकले आहेत. एनआयएच्या टीमने ऑगस्ट २०१८ मध्ये कथित स्वरूपात आयएएसशी संबंध असल्याच्या संशयातून मोहम्मद अब्दुल्ला बासित आणि मोहम्मद अब्दुल कादीर यांना अटक केली होती. आता पुन्हा त्याच प्रकरणात एनआयएने ही छापेमारी केली असल्याचं वृत्त समोर येत आहे.

पोलिसांनी सांगितले की, "या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या आरोपीं विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आणखीन माहिती मिळाल्यावर दहशतवादाच्या संशयावरुन ही छापेमारी करण्यात आली आहे". या प्करणी सायबराबाद पोलीस आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, "दहशतवादी संघटना ISIS शी संबंध असल्याप्रकरणी हैदराबाद आणि वर्ध्यांत एनआयएच्या टीमकडून तपास सुरू आहे". मात्र, त्यांनी या बाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

११ जानेवारी रोजी उत्तरप्रदेशातील अमरोहा, लखनऊ, मेरठ आणि हापुड सह जवळपास १७ जागांवर एनआयएच्या टीमने छापेमारी केली होती. त्यावेळी १० संशयितांना ताब्यात घेत एनआयएच्या टीमने या आयसिस मॉडलचा कथित म्होरक्या मुफ्ती मोहम्मद सोहैल याला सुद्धा ताब्यात घेतलं होतं.

याच वर्षी जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील एटीएस पथकाने नऊ जणांना अटक केली होती. एटीएसच्या मते, अटक करण्यात आलेल्यांचा ISIS शी संबंध आहे. या संशयितांच्या अटकेसाठी एटीएसच्या पथकाने महाराष्ट्रातील पाच विविध ठिकाणी छापेमारी केली होती. ज्यामध्ये मुंब्रा, ठाणे आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. एटीएसच्या मते, अटक करण्यात आलल्या संशयितांकडून संवेदनशील माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये NIA चे छापे Description: NIAच्या पथकाने हैदराबाद आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. शनिवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
Loading...
Loading...
Loading...