आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद आणि आईडी प्रकरणात १६ ठिकाणी एनआयएच्या धाडी

बठिंडीमधील आयइडी जप्ती आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे 'आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद' हे मासिक या दोन प्रकरणांमध्ये एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये सोळा ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली.

NIA raids at 16 places in J&K in 'ISIS-Voice of Hind', Bathindi IED recovery cases
आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद आणि आईडी प्रकरणात १६ ठिकाणी एनआयएच्या धाडी 
थोडं पण कामाचं
  • आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद आणि आईडी प्रकरणात १६ ठिकाणी एनआयएच्या धाडी
  • जम्मू काश्मीरमध्ये सोळा ठिकाणी तर कर्नाटकमध्ये दोन ठिकाणी कारवाई
  • कर्नाटक: जुफरी जवाहर दामुदी याला अटक

श्रीनगर: बठिंडीमधील आयइडी जप्ती आणि दहशतवादाला पाठिंबा देणारे 'आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद' हे मासिक या दोन प्रकरणांमध्ये एनआयएने जम्मू काश्मीरमध्ये सोळा ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली. सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या सहकार्याने एनआयएने कारवाई केली.  NIA raids at 16 places in J&K in 'ISIS-Voice of Hind', Bathindi IED recovery cases

जम्मू काश्मीर व्यतिरिक्त कर्नाटकमधील भटकळ येथे दोन ठिकाणी एनआयने धाड टाकली आणि जुफरी जवाहर दामुदी याला अटक केली. भारतविरोधी कारवाया करणे, भारतविरोधी कारवायांसाठी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेला मदत करणे असे आरोप ठेवून दामुदीला अटक करण्यात आली. ही कारवाई एनआयएने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने केली. 

दामुदीला अबू हजीर अल-बद्री या नावानेही ओळखले जाते. 'आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद'  मासिकाचे दाक्षिणात्य भाषांमध्ये भाषांतर करुन मासिकाच्या प्रतींच्या वितरणातून तो तरुणांचे ब्रेन वॉश करत होता. तरुणांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी चिथावणी देण्याकरिता तो प्रयत्न करत होता. याआधी एनआयएने ११ जुलै २०२१ रोजी उमर निसार, तनवीर अहमद भट आणि रमीज अहमद लोन या तिघांना भारतविरोधी कारवायांसाठी अटक केली. हे तिघे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील अचबलचे रहिवासी होते. 

'आयसिस-व्हॉइस ऑफ हिंद' हे मासिक 'व्हॉइस ऑफ हिंद' या नावानेही ओळखले जाते. या मासिकातून दहशतवादाला चालना देणारे विचार प्रसिद्ध केले जातात. मासिकातील लेख आणि फोटो यांच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेन वॉश केले जाते. तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या प्रकारांना रोखण्यासाठी दहशतवादाकडे ओढा असलेल्या तरुणांना ताब्यात घेऊन त्यांचे कउन्सलिंग करुन त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी