एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक; 112 एनकाउंटर करणारे शर्मा मानले जातात वाझेंचे गुरू

उद्योगपती अंबानी  (Industrialist Ambani) धमकी प्रकरण (threat case) तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren murder case) राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) तपास करत आहे.

NIA raids Pradip Sharma's house Possibility of arrest
प्रदीप शर्मांच्या घरावर NIA चा छापा; अटकेची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • प्रदीप शर्मांनी 35 वर्षे पोलिस विभागात सेवा केली आहे.
  • अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असल्याचा संशय
  • प्रदीप शर्मांनी आपल्या कार्यकाळात केले आहेत 112 एनकाउंटर.

मुंबई : उद्योगपती अंबानी  (Industrialist Ambani) धमकी प्रकरण (threat case) तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren murder case) राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) तपास करत आहे. या तपासादरम्यान एनआयएने एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Encounter Specialist Pradeep Sharma) यांच्या घरावर छापा (raid) टाकला आहे, सकाळी सहा वाजता एनआयकडून प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीमधील घरावर हा छापा टाकण्यात आला. प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.   प्रदीप शर्मा यांची पाच तास कसून चौकशी केल्यानंतर एनआयएकडून अटक करण्यात आली आहे.  (NIA Arrested to Pradip Sharma's house)

उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात एनआयएने याआधी माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली होती. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे. अनेक दिवसांपासून प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले आहे. 

35 वर्षे पोलिस विभागात कार्यरत, नावावर आहेत 112 एनकाउंटर 

उत्तर प्रदेशमध्ये जन्म झालेले आणि नंतर धुळ्यात वाढेलल्या प्रदीप शर्मांनी 35 वर्षे पोलिस विभागात सेवा केली. प्रदीप शर्मा ठाण्यातील अँटी एक्सटॉर्शन सेलमध्ये कार्यरत होते. 90 च्या दशकात त्यांना मुंबई क्राइम ब्रांचमध्ये सामील करण्यात आले. त्या टीमला मुंबई अंडरवर्ल्डचा खात्मा करण्याची जबाबदारी दिली होती. तेव्हापासूनच शर्मांची एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख झाली. ​​​​​​आपल्या कार्यकाळात त्यांनी 112 एनकाउंटर केले. 100 पेक्षा जास्त एनकाउंटर करणारे ते देशातील पहिले पोलिस अधिकारी आहेत. 2019 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली. पण, त्यात त्यांचा पराभव झाला.

बनावट चकमकीमुळे झालं होतं निलंबन

दरम्यान, शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता. या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.

वाझे आणि शर्मामध्ये काय संबंध ?

निलंबित झाल्यानंतर वाझेने शिवसेनेत प्रवेश केला होता. शर्मालाही शिवसेनेत एंट्री मिळण्याचे कारण वाझेच आहेत. पंरतु, 2008 नंतर वाझेचे सदस्यत्व रिनीव्ह केले नसल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. प्रदीप शर्माला वाझेचा गुरु मानले जाते.

NIA ला शर्माकडून काय माहिती हवी ?

शर्मा आणि वाझेची अखेरची भेट कधी झाली? नोकरी सोडल्यानंतर शर्मा वाझेच्या संपर्क होता का? शर्मा-वझे-शिंदेची मीटिंग झाली का? वाझे आणि शिंदेने मनसुख हिरेनबाबत काही सांगितलं होतं का ? या प्रश्नांची उत्तरे एनआयएला शर्माकडून हवी आहेत.

शर्मा NIA च्या रडारवर का आले ?

सुत्रांनी सांगितल्यानुसार, NIA कडे प्रदीप शर्मा आणि सचिन वाझेच्या मीटिंगची माहिती आहे. तपासादरम्यान एनआयएला माहिती मिळाली आहे की, मनसुख हिरेनच्या खूनाच्या काही दिवसांपूर्वी वाझेने अंधेरी परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली होती. प्रदीप शर्मा त्याच भागात राहतात. वाझे आणि शर्माची भेट झाल्याचा एनआयएला संशय आहे. एका CCTV फुटेजमध्ये वाझे आणि शिंदे वांद्रे-वरळी सी लिंकवर कारमध्ये बसलेले दिसत आहेत. ते दोघे शर्माला भेटण्यासाठी जात असल्याचा संशय आहे. मनसुखला ज्या नंबरवरुन कॉल करुन बोलवण्यात आले होते, त्या नंबरचे शेवटचे लोकेशनही अंधेरीतील जेबी नगर होते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी