Nightclub fire : नाइटक्लबला लागली आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू

Nightclub fire kills 16 People : आफ्रिका खंडातील कॅमेरून देशाची राजधानी याउंदे येथील एका प्रसिद्ध नाइटक्लबला आग लागली. या दुर्घटनेत १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Nightclub fire kills 16 People
नाइटक्लबला लागली आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • नाइटक्लबला लागली आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू
  • कॅमेरून देशाची राजधानी याउंदे येथील एका प्रसिद्ध नाइटक्लबला लागली आग
  • अनेकजण जखमी

Nightclub fire kills 16 People : याउंदे : आफ्रिका खंडातील कॅमेरून देशाची राजधानी याउंदे येथील एका प्रसिद्ध नाइटक्लबला आग लागली. या दुर्घटनेत १६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

नाइटक्लबला आग लागण्याचे कारण अद्याप समजले नाही. मात्र आगीच्या ज्वाळा आणि धूर साठल्यामुळे बंदीस्त असलेल्या या नाइटक्लबमध्ये एक मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली. होरपळून मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. 

याउंदेमध्ये 'आफ्रिकन फुटबॉल कप ऑफ नेशन्स टुर्नामेंट' सुरू आहे. ही स्पर्धा बघण्यासाठी संपूर्ण आफ्रिकेतून मोठ्या संख्येने विदेशी नागरिक याउंदमध्ये आले आहेत. मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम सुरू असतानाच याउंदेमध्ये दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुर्घटनेची चौकशी होईल तसेच मृतांमध्ये आणि जखमींमध्ये विदेशी नागरिक आहेत का हे तपासून त्यांच्याविषयीची माहिती तातडीने जाहीर केली जाईल; असे कॅमेरून देशाच्या सरकारने जाहीर केले. 

प्राथमिक वृत्तानुसार नाइटक्लबच्या किचनमध्ये एका सिलेंडरमधून वायू गळती झाली. नंतर आग लागली आणि वेगाने पसरली. या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे कॅमेरून देशाच्या सरकारने जाहीर केले. कॅमेरूनचे राष्ट्रपती पॉल बिया यांनी दुर्घटनेची माहिती मिळताच शोक प्रकट केला. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना त्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी