नऊ वर्षाच्या अव्दैतला घ्यायचीय आकाशात झेप; राहुल गांधींनी शेअर केला विमानातील व्हिडिओ

राहुल गांधी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. व्यस्त असताना सुद्धा खाली वेळ काढत असतात त्यात ते युवकांशी संवाद साधत असतात.

Nine year boy want be pilot Rahul Gandhi Share flight video with boy
नऊ वर्षाच्या अव्दैतला घ्यायचीय आकाशात झेप  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • राहुल गांधींनी ९ वर्षाच्या मुलाला पायलट होण्याचे सांगितले गुण
  • कोणतंच स्वप्न मोठं नसत- राहुल गांधी
  • सोशल मीडियावर राहुल गांधींचा व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : राहुल गांधी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. तरीपण ते व्यस्त असताना सुद्धा खाली वेळ काढून ते युवकांशी संवाद साधत असतात. तर कधी ते युट्युबरांशी वेळ घालवतांना दिसतात. राहुल गांधी यांचे असे  व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत असतात आणि नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद देखील मिळत असतो. त्याचा अशाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका ९ वर्षाच्या मुलाला तुला मोठं होऊन काय व्हायचंय आहे, असा  प्रश्न केला. मुलाने लागेच उत्तर देत पायलट व्हायचं असल्याचे म्हटलं. त्यानंतर राहुल गांधी यांनी त्या मुलाला त्याचं स्वप्न कसे पुर्ण होईल त्याविषयी माहिती दिली. 

कोणतेच स्वप्न मोठं नसतं

राहुल गांधी यांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी कोणतंच स्वप्न खूप मोठं नसतं असं कॅप्शन दिलं आहे. त्यात पुढे लिहिलंय की ''आम्ही अद्वैतचे स्वप्न साकार करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. आता एक समाज अशी संरचना निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. ज्याने त्याला प्रत्येक संधी मिळेल''. संधी (उड्डाण).

मला पायलट व्हायचंय

व्हिडिओची सुरुवातीला राहुल गांधी आणि लहान मुलगा गप्पा मारताना दिसत आहेत. त्यावेळी राहुल गांधी लहान मुलाला मोठ होऊन काय व्हायचंय असा प्रश्न करतात. लगेच उत्तर देताना मुलागा म्हणला की , मला पायलट व्हायचं आहे. त्यावर राहुल गांधी दुसरा प्रश्न केला, पायलटचं का बनायचं आहे? त्यावर मुलगा उत्तर देताना म्हणाला की, मला उडण्याची इच्छा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rahul Gandhi (@rahulgandhi)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दुसऱ्या दिवशी, राहुल गांधी यांनी अद्वैतला एका विमानाच्या कॉकपीटमध्ये जाण्याची व्यवस्था करतात. पायलट आणि राहुल गांधी यांनी त्याला विमान उडवण्याचे तंत्र सांगितले, अव्दैत ते सर्व लक्ष देऊन ऐकताना दिसतोय. राहुल गांधी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. नेटिझन्सला हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ इंस्टग्रामवर १.६ लाखपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी