Nirav Modi: नीरव मोदीला चौथ्यांदा झटका, जामीन पुन्हा फेटाळला

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 12, 2019 | 17:35 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Nirav Modi Bail: पंजाब नॅशनल बँकेल १३ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आणखीन काही दिवस तुरूंगात राहावं लागणार आहे. त्यांचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.

Nirav Modi Bail
Nirav Modi: नीरव मोदीला चौथ्यांदा झटका, जामीन पुन्हा फेटाळला  |  फोटो सौजन्य: BCCL

UK High Court denies bail to Nirav Modi: देशातून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचं दिसतंय. लंडनच्या उच्च न्यायालयानं नीरव मोदीचा जामीन अर्ज बुधवारी पुन्हा एकदा फेटाळला. त्यामुळे चौथ्यांदा नीरव मोदीला झटका बसला आहे. नीरव मोदीनं २ अब्ज डॉलर पंजाब नॅशनल बँकेतून कर्ज म्हणून घेतले होते आणि ते न फेडताच त्यानं देशातून पळ काढला. फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यात येईल. 

न्यायाधीश इंग्रिड सिमलरनं नीरव मोदी आणि भारताच्या वतीनं ब्रिटनचे अभियोजन सेवा करणाऱ्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यांनी म्हटलं की, विश्वास ठेवण्याचा हा एक ठोस आधार आहे की, जामीन दिल्यानंतर पुन्हा नीरव मोदी कायद्यासमोर आत्मसमर्पण करणार नाही.

त्यांनी मान्य केलं की, नीरव मोदीची जामिनावर सुटका केल्यास तो पुराव्यासोबत फेरफार आणि न्यायालयीन प्रक्रियेत काहीतरी  अडथळा निर्माण करू शकतो. याआधी नीरव मोदीच्या वकिलांनी मंगळवारी उच्च न्यायालयासमोर आपला युक्तिवाद सादर केला होता. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं निर्णय देण्यासाठी बुधवारचा दिवस निश्चित केला होता. 

यापूर्वी लंडनच्या न्यायालयानं तीन वेळा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. मॅजिस्ट्रेट्स कोर्टाने विचार केला की, भारतातून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला जामीन मंजूर करण्यास मोठा धोका आहे.त्याला जामीन मंजूर केल्यास तो ब्रिटनहून सुद्धा पळून जाऊ शकेल आणि समर्पण करणार नाही. लंडनच्या पोलिसांनी १९ मार्चला नीरव मोदीला अटक केली आणि त्यानंतर मोदी तुरूंगाची हवा खातोय. 

तर मंगळवारी आलेल्या बातमीनुसार, नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण झाल्यास दोघांना आर्थर रोडच्या कारागृहातली बराक नंबर १२ मध्ये ठेवण्यात येईल. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील तुरुंग प्राधिकरणानं माहिती दिली की, नीरव मोदीला आर्थर रोड कारागृहातली बराक नंबर १२ मध्ये जाण्याची शक्यता आहे. हा तोच बराक नंबर आहे ज्यात विजय मल्ल्याला देखील ठेवण्याची चर्चा सुरू आहे. 

Vijay Mallya Nirav Modi

सध्या हे दोघंही लंडनमध्ये आहेत. नीरव मोदी लंडनच्या तुरूंगात बंद आहे. तर विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची केस सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणची प्रक्रिया सुद्धा लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टात सुरू आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Nirav Modi: नीरव मोदीला चौथ्यांदा झटका, जामीन पुन्हा फेटाळला Description: Nirav Modi Bail: पंजाब नॅशनल बँकेल १३ हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याला आणखीन काही दिवस तुरूंगात राहावं लागणार आहे. त्यांचा चौथ्यांदा जामीन अर्ज फेटाळला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles