Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार; लंडन उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

Nirav Modi Extradition: PNB कर्ज घोटाळा प्रकरणात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोप असलेल्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन न्यायालयाने नीरवचा अर्ज फेटाळला आहे.

Nirav Modi Extradition
Nirav Modi Extradition: नीरव मोदी लवकरच भारतात येणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नीरव मोदीची मानसीक स्थिती पाहून प्रत्यार्पण करण्याची सुनावणी करण्यात आली.
  • प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधात नीरव मोदीने लंडनच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
  • नीरव मोदीने बँकेची 2 अब्ज डॉलर्सची फसवणूक केली आहे.

Nirav Modi PNB Scam: हिरा व्यापारी (diamond merchant) असलेल्या नीरव मोदी (Nirav Modi) ला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन न्यायालयाने (London Court) नीरवचा अर्ज फेटाळला आहे. फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे (Money laundering)आरोप  नीरव मोदीवर आहेत. या प्रकरणात उच्च न्यायालयाने (High Court)त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले आहेत. (Nirav Modi to come to India soon; The application was dismissed by the London High Court )

अधिक वाचा  : ट्विटरनंतर फेसबुकमधून 11 हजार कर्मचाऱ्यांना काढले
न्यायमूर्ती जेरेमी स्टुअर्ट स्मिथ आणि न्यायमूर्ती रॉबर्ट जे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला नीरवच्यावतीने याचिका दाखल केली होती याचिकेवर सुनावणी करताना लंडन हायकोर्टाने बुधवारी हिरे व्यापारी नीरव मोदीचे भारतात प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले. भारतातील पीएनबी कर्ज घोटाळा प्रकरणात फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोप नीरववर आहेत.  बँकेची 2 अब्ज डॉलर्सची फसवणूक केल्याचा आरोप नीरववर आहे.

जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील

51 वर्षीय नीरव मोदी सध्या दक्षिण-पूर्व लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात बंद आहे. भारताकडे नीरव मोदीचं प्रत्यार्पण व्हावे याची मागणी भारताकडून करण्यात आली होती. त्याविरुद्धात नीरव मोदींने आव्हान केले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या आदेशाविरोधात लंडनच्या जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.

अधिक वाचा  : तुरुंगात बाहेर येताच संजय राऊतांना कोणाचा फोन?

नीरवची मानसिक स्थिती तपासण्यात आली

हायकोर्टाने दोन कारणास्तव या याचिकेवर सुनावणी करण्यास परवानगी दिली होती. युरोपियन मानवाधिकार कराराच्या (ईसीएचआर) कलम 3 अंतर्गत, जर नीरवचे प्रत्यार्पण त्याच्या मानसिक स्थिती पाहून युक्तिवाद ऐकण्याची परवानगी दिली. मानसिक आरोग्याशी संबंधित  प्रत्यार्पण कायदा 2003 च्या कलम 91 अंतर्गत या सुनावणीला परवानगी देण्यात आली होती.

हाँगकाँगमधील 253 कोटींची मालमत्ता जप्त

जुलै महिन्यामध्ये सक्तवसूली संचालनालयाने म्हणजे ईडीने (Enforcement Directorate)मोठी कारवाई करत नीरव मोदीची हाँगकाँगमधील 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये हिरे, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश होता. पंजाब नॅशनल बँकेसह (PNB) अनेक वित्तीय संस्थांची फसवणूक करणारा नीरव मोदी सध्या इंग्लंडमध्ये वास्तव्यास होता आता तो तेथील तुरुंगात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी