Nirbhaya Case: निर्णयाच्या समीक्षा याचिकवेर १७ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 12, 2019 | 18:34 IST | टाइम्स नाऊ हिंदी

दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या समीक्षा याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टाने या प्रकरणातील सर्व पक्षांना १३ तारखेला समन्स बजावले होते.

Nirbhaya Case: निर्णयाच्या समीक्षा याचिकवेर १७ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी
Nirbhaya gangrape case hearing against judgement on december 17 in supreme court  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • २०१२मध्ये झालेल्या या प्रकरणातील एक आरोपी अक्षय कुमार सिंह याच्या समीक्षा याचिकेवर सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीश १७ डिसेंबरला ही सुनावणी करतील.
  • सुरक्षेच्या कारणास्तव, खटल्यातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाईल.
  • १७ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात पुनरावलोकन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

नवी दिल्ली: दिल्लीत घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्णयाच्या समीक्षा याचिकेवर १७ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. २०१२मध्ये झालेल्या या प्रकरणातील एक आरोपी अक्षय कुमार सिंह याच्या समीक्षा याचिकेवर सुप्रीम कोर्टातील तीन न्यायाधीश १७ डिसेंबरला ही सुनावणी करतील. कोर्टाने या प्रकरणातील सर्व पक्षांना १३ तारखेला समन्स बजावले होते.

या सुनावणीकरता आरोपींचे वकील पीपी राजीव मोहन, वृंदा ग्रोव्हर आणि निर्भयाचे वकील यांना सकाळी १० वाजता कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, खटल्यातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केले जाईल. कोर्टाला आरोपींनी केलेल्या याचिकेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही सुनावणी होणार आहे. १७ डिसेंबर रोजी सुप्रीम कोर्टात पुनरावलोकन याचिकेवर सुनावणी होणार आहे. आरोपींनी अद्याप त्यांना असलेल्या कायदेशीर बांबीचा फायदा घेतला नसल्यामुळे खटल्याच्या सुनावणीपूर्वी मृत्यूच्या वॉरंटवर सही होऊ शकत नाही असे कोर्टात सांगितले आहे.

याआधी निर्भया प्रकरणातील दोषी आरोपींबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यांच्या फाशीबाबतची तारीखही नक्की झाल्याचे बोलले जात होते. या प्रकरणातील उरलेल्या चार आरोपींना फाशी देण्यात येणार असून ही फाशी त्याच दिवशी म्हणजे १६ डिसेंबर रोजी दिली जाणार असल्याच्या बातम्या सध्या पसरत होत्या. मात्र फाशी देण्यासाठी जल्लाद मिळत नसल्याचेही बोलले जात आहे. तर तिहार जेलमध्ये या आरोपींना फाशी देण्याचे ट्रायलही झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील एक आरोपी पवन कुमार गुप्ता याला सुरक्षेच्या कारणास्तव तिहार जेलमध्ये हलविण्यात आले होते.

१६ डिसेंबर २०१२मध्ये निर्भयावर सहा नराधमांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर तिच्यावर अनेक उपचार झाले, मात्र ती वाचली नाही. सहापैकी एक आरोपी हा अल्पवयीन होता. त्याची सुटका झाली आहे. तर एका आरोपीने आत्महत्या केली. तेव्हा उरलेल्या चार आरोपींना अद्याप फाशी झाली नसल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. घटनेच्या इतक्या वर्षांनंतरही निर्भयाला न्याय मिळालेला नाही. तेव्हा फाशीची अंतिम तारीख कोर्टाकडून येण्याची वाट सर्वचजण पाहत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी