Times Now Summit 2021 :  निर्मला सीतारामन, अरविंद केजरीवाल, नितीन गडकरी, पियुष गोयल, डॉ कृष्णा एला, नीरज चोप्रा आणि इतर  सामील होणार टाइम्स नाऊ समिट 2021 मध्ये

भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष सेलिब्रेट करायचे  आणि भारताला १०० वर्षापर्यंत कसा आकार द्यायचा हे या समिटचे उद्दिष्ठ आहे.  टाइम्स नाऊ समिट 2021 नवी दिल्ली येथे 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तुमची तिकिटे आता www.timesnowsummit.com वर बुक करा

nirmala sitharaman arvind kejriwal nitin gadkari piyush goyal dr krishna ella neeraj chopra among others in times now summit
टाइम्स नाऊ समिटमध्ये सामील होणार हे मान्यवर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष सेलिब्रेट करायचे  आणि भारताला १०० वर्षापर्यंत कसा आकार द्यायचा हे या समिटे उद्दिष्ठ आहे.
  •  टाइम्स नाऊ समिट 2021 नवी दिल्ली येथे 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
  • तुमची तिकिटे आता www.timesnowsummit.com वर बुक करा

टाइम्स नेटवर्क, भारताचे प्रीमियम ब्रॉडकास्ट नेटवर्क 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे टाइम्स नाऊ समिट 2021 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करणार आहे. भारताच्या प्रगतीसाठी कृती आराखड्याला गती देण्याच्या उद्देशाने ही कल्पना सादर करण्यात येणार आहे. यात टाईम्स नाऊ समिट, एक प्रमुख नेतृत्व मंच उपलब्ध करून देणार आहे.  यावर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सेलेब्रेटिंग इंडिया@75 ही थीम घेऊ  आघाडीवर आहे. भारताला १०० व्या वर्षी कसा आकार देणार हे शेपिंग इंडिया@100च्या माध्यमातून विचार मंथन केले जाणार आहे. 

कठोर कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून, टाईम्स नाऊ समिट 2021 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, जो प्रत्येक विवेकी भारतीयांसाठी खुला आहे, ज्यांना भारत आणि परदेशातील दिग्गजांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या भविष्याची कल्पना, योजनांना आकार घ्यायचा आहे, ते या समिटच्या लाभ घेऊ शकतात. 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातील गौरवशाली कामगिरीचा उत्सव साजरा करत आणि पुढील 25 वर्षांतील देशाच्या धोरणात्मक, भू-राजकीय आणि आर्थिक प्रवासाला संबोधित करताना, 25 हून अधिक गतिशील सत्रांसह 2 दिवसीय शिखर परिषदेत केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, प्रभावशाली व्यक्ती सहभागी होतील. तसेच कॉर्पोरेट नेते, भारताचे व्यापार धोरण, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा मार्ग, संरक्षण धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, इंडो-पॅसिफिक थिएटरमधील क्वाड अलायन्स, लसीकरण, अंतराळ शर्यतीतील स्थान, भारताचे राजकीय परिदृश्य आणि  विरोधकांचे भविष्य यासह राष्ट्रीय प्राधान्याच्या विषयांवर संवाद साधला जाणार आहे. 

शिखर परिषदेतील वक्त्यांच्या पॉवर पॅक लाइनअपमध्ये निर्मला सीतारामन - अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, अरविंद केजरीवाल - मुख्यमंत्री, दिल्ली, नितीन गडकरी - रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री, पीयूष गोयल - वाणिज्य आणि उद्योग मंत्री, वस्त्रोद्योग, स्मृती इराणी - महिला आणि बालविकास मंत्री, धर्मेंद्र प्रधान - शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, हरदीप सिंग पुरी - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मनसुख मांडविया - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, किरेन रिजिजू - मंत्री कायदा आणि न्याय, अनुराग ठाकूर - सूचना आणि प्रसारण मंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा, अमरिंदर सिंग - माजी मुख्यमंत्री, पंजाब, आदित्य ठाकरे - पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र सरकार, असदुद्दीन ओवेसी - अध्यक्ष, AIMIM, डॉ कृष्णा एला - CMD , भारत बायोटेक आणि नीरज चोप्रा - टोकियो 2020 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि इतर मान्यवरांचा समावेश आहे. 

times now summit

या वर्षीच्या समिटबद्दल बोलताना, एमके आनंद - एमडी आणि सीईओ, टाईम्स नेटवर्क म्हणाले, “भारतातील सर्वात प्रभावशाली न्यूज नेटवर्क म्हणून, आम्ही भारताच्या वाढीच्या कथेसाठी वचनबद्ध आहोत आणि आमच्या न्यूज ब्रँड्स आणि स्थापित इव्हेंट प्लॅटफॉर्मद्वारे ही कथा यशस्वीपणे चालवत आहोत. टाईम्स नाऊ समिट 2021 हे न्यू इंडिया व्हिजनला गती देण्यासाठी आणि भारताच्या प्रगतीसाठी रचनात्मक कृती योजना विकसित करण्याच्या तातडीच्या उद्देशाने व्यस्त आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की, आम्‍ही आता परिवर्तनकारी बदलाच्या उंबरठ्यावर आहोत आणि भू-राजकीय आणि आर्थिक गतीशीलतेतील  बदलांमध्‍ये भारताच्या पुढील 25 वर्षांसाठी एक सुसंगत फ्रेमवर्क सेट करणे समर्पक आहे. टाईम्स नाऊ समिट 2021 भारताच्या गेल्या 75 वर्षातील अनेक उपलब्धी आणि टप्पे साजरे करते आणि पुढील 25 वर्षांत राष्ट्राला आकार देण्यासाठी कृती करण्यायोग्य धोरणे आणि उपाय साध्य करण्यासाठी एक निश्चित व्यासपीठ सादर करते.”


टाइम्स नाऊ समिट 2021 हे हर्बालाइफ न्यूट्रिशन द्वारे सादर केले जाते, डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीज द्वारा पॉवरर्ड बाय, ड्रिव्हन बाय  मारुती सुझुकी आणि बँक्वेट पार्टनर, MEIL द्वारे सादर करण्यात येणार आहे. 


तुमची सीट ब्लॉक करण्यासाठी, https://www.timesnowsummit.com/ ला भेट द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी