कार्यक्रमात भडकले गडकरी, म्हणाले- कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाहेर काढा!

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 29, 2020 | 11:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी एका व्हर्चुअल कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सडकून टिका केली. गडकरी यांचे हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Nitin Gadkari
NHAIच्या कार्यक्रमात भडकले गडकरी, म्हणाले- कामचुकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना बाहेर काढणे गरजेचे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एनएएचआयच्या कार्यक्रमात भडकले गडकरी
  • केंद्रीय मंत्री गडकरी यांची टिका- अपात्र आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना काढा बाहेर
  • गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचे केले उद्घाटन

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (Central Road Transport and Highways Minister) नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोमवारी दिल्लीच्या (Delhi) द्वारकामध्ये (Dwarka) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएएचआय) (National Highway Authority of India) नव्या इमारतीचे (new building) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) उद्घाटन (inauguration) केले. यावेळी गडकरी यांनी इमारत पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाबद्दल (delay in completion) बरीच नाराजी (expresses discontent) व्यक्त केली आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचे (oust the non-performing officers) वक्तव्य केले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी एनएएचआयच्या या बांधकामाबाबतच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित (questions the working style) केले.

९ वर्षांनी पूर्ण झाले कार्य

आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गडकरी म्हणाले, ‘अशा कार्यक्रमांमध्ये प्रथा असते की कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर त्या सर्वांचे अभिनंदन करण्याची आणि शुभेच्छा देण्याची प्रथा असते. मात्र मला संकोच वाटत आहे की मी आपले अभिनंदन कसे करू, कारण २००८मध्ये ठरले होते की ही इमारत बांधायची. २०११मध्ये याची निविदा झाली होती. हे दोन-अडीच कोटी रुपयांचे कार्य ९ वर्षांनंतर आज पूर्ण झाले. हे काम पूर्ण झालेले पाहण्यासाठी २ सरकारे आणि ८ चेअरमन लागले आणि यानंतर हे काम पूर्ण झाले. सध्याचे चेअरमन आणि सदस्यांचा याच्याशी संबंध नाही.’

कार्यालयात लावावेत अशा अधिकाऱ्यांचे फोटो

अधिकाऱ्यांवर टिका करताना गडकरी यांनी विद्यमान एनएएचआयच्या अध्यक्षांना म्हटले, ‘चेअरमन साहेब, ज्या महान व्यक्तींनी २०११पासून ते २०२०पर्यंत यात काम केले आहे, त्या सर्वांचे, सीजीएम आणि जीएम साहेबांचे फोटो एकदा कार्यालयात अवश्य लावा की ज्यांनी ९ वर्षे या कामाबद्दल निर्णय न घेतल्याने विलंब केला. किमान त्यांचा इतिहासही समोर येऊ दे. आपण आणि आम्ही मोठ्या अभिमानाने सांगतो की दिल्ली-मुंबई महामार्ग आम्ही २ वर्षांत पूर्ण करू जो ८० हजार, १ लाख कोटींपर्यंत आहे. १ लाख कोटींच्या कामासाठी जर ३ किंवा साडेतीन वर्षे लागत असतील आणि २०० कोटीच्या कामासाठी आपण १० वर्षे घालवली तर ही अभिनंदन करण्यासारखी गोष्ट नाही.’

विषकन्येसारखे लोक

गडकरी यांनी मान्य केले की त्यांनी या कामासाठी स्वतः बैठक घेतली होती. ते म्हणाले, ‘मी यासाठी २-४ बैठका घेतल्या होत्या. आता सरकारी पद्धतीप्रमाणे कंत्राटदारावर जबाबदारी टाकत प्रकरण एनसीएलटीमध्ये गेले आणि तसा अहवाल तयार होईल. यात सर्वात आवश्यक गोष्ट ही आहे की जे विकृत विचार करणारे लोक आहेत. ज्यांना इथे काम करायचे नाही, जर करायचे असेल तर ते रस्ता रोखण्याचे.. असे लोकही १२-१२ १३-१३ वर्षे इथे चिकटलेले आहेत. हे लोक मंत्रालयाचे सल्लेही धुडकावून लावतात. अशा लोकांची विचारधारा विषकन्येसारखी आहे. NHAIमध्ये अकार्यक्षम, कामचुकार आणि भ्रष्ट लोक इतके शक्तिशाली आहेत की मंत्रालयाने सांगूनही ते आपले निर्णय चुकीचे घेतात. अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची ही वेळ आहे.’

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी