Hydrogen Car : हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन गडकरी पोहोचले संसदेत, जाणून घ्या या गाडीचे फीचर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संसदेत हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन आले. ही गाडी टोयोटा मिराई आहे. नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेल ऐवजी पर्यावरणपूरक इंधन वापरावे असा सल्ला देत असतात. गडकरी म्हणाले की आम्ही ग्रीन हायड्रोजन बनवले आहे ज्याची निर्मिती पाण्यापासून होते.

hydrogen car
हायड्रोजन कार  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संसदेत हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन आले.
  • ही गाडी टोयोटा मिराई आहे.
  • ग्रीन हायड्रोजनची निर्मिती पाण्यापासून होते.

Green Hydrogen Car : नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संसदेत हायड्रोजनवर चालणारी गाडी घेऊन आले. ही गाडी टोयोटा मिराई आहे. नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेल ऐवजी पर्यावरणपूरक इंधन वापरावे असा सल्ला देत असतात. गडकरी म्हणाले की आम्ही ग्रीन हायड्रोजन बनवले आहे ज्याची निर्मिती पाण्यापासून होते. ग्रीन हायड्रोजनवर चालणारी ही गाडी टोयोटाचे मॉडेल असून या गाडीचे नाव टोयोटा मिरा आहे. ही गाडी एक पायलट प्रोजेक्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले. देशात आता ग्रीन हायड्रोजनची निर्मिती होईल आणि देशात रोजगार निर्मिती होईल अशी अशा त्यांनी व्यक्त केली.  

गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारने ग्रीन हायड्रोजनसाथी ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच भारत हायड्रोजन निर्यात करणारा देश होईल. जिथे कोळसा वापरला जातो तिथे आता ग्रीज हायड्रोजन वापरला जाईल असे गडकरी म्हणले. 

जानेवारीत गडकरी म्हणाले होते की लवकरच दिल्लीत हायड्रोजनवर चालणार्‍या नव्या कार्स दिसतील. हायड्रोजन इंधन वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जाईल. हायड्रोजन इंधन हे आता भविष्यात वापरले जाणारे इंधन असेल. टोयोटा मिरा ही जपानच्या टोयोटा गाडी असून गडकरी यांनी हरयाणातील फरीदाबादच्या इंडियन ऑईलच्या पंपावरून या गाडीत हायड्रोजन इंधन भरले होते. 

ग्रीन हायड्रोजनवर कशी चालते गाडी

  1. ग्रीन हायड्रोजन हे एक इंधनाला पर्याय असून ग्रीन हायड्रोजन कुठल्याही गाडीवर चालू शकतं. 
  2. ग्रीन हायड्रोजने ही मध्यम आणि मोठ्या प्रवासासाठी वापरता येणार आहे. 
  3. ग्रीन हायड्रोज हे शुन्य उत्सर्जन इंधन असून यामुळे कुठलेही प्रदूषण होत नाही. 
  4. एका गाडीत हायड्रोजन इंधन भरण्यासाठी ३ ते पाच मिनिटाचा वेळ लागतो. 
  5. हायड्रोजनवर चालणार्‍या गाड्यांमध्ये एक उच्च दाबाची टाकी बसवली जाते. या टाकीत वीजनिर्मिती करण्यासाठी इंधन टाकावे लागते. हायड्रोज आणि ऑक्सिजनमुळे वीज निर्माण होते आणि त्यावर गाडी चालते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी