Nitin Gadkari | शेतकऱ्य़ांनी बनवलेल्या इंधनावर धावणार गाड्या, गडकरी काढणार आदेश

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 30, 2021 | 17:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nitin Gadkari on flex fuel car | भारतात दर वर्षी आठ लाख कोटी रुपयांचे पेट्रोलियम उत्पादन (petroleum Products) आयात होतो. जर भारत इंधनासाठी अशाच प्रकारे इतर देशांवर अबलंबून राहणार असेल तर पुढील पाच वर्षात हा आकडा २५ लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज गडकरी यांनी व्यक्त केला.  

nitin gadkari to decision flex fuel engine in cars
नितीन गडकरी 
थोडं पण कामाचं
  • इथेनॉल हे एक प्रकारे हरित इंधन
  • फ्लेक्स इंधन इंजिन असलेल्या गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे इंधन वापरता येतं.
  • ग्रीन हायड्रोजनवर देशात कार, बाईक्स आणि ट्रक्स धावतील

Nitin Gadkari |  नवी दिल्ली  : पुढील काही दिवसांत कारमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन (flex fuel engine) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे . ज्या प्रमाणे ब्राझील, कॅनडा आणि अमेरिका देशात गाड्या १०० टक्के बायो इथेनॉलवर (Bio Ethanol Fuel)  चालतात, त्याचप्रमाणे आपल्याकडे शेतकर्‍यांनी बनवलेल्या इथेनॉल इंधनावर गाड्या धावतील असे गडकारी म्हणाले. इथेनॉल हे एक प्रकारे हरित इंधन (Green Fuel) असून यामुळे प्रदूषण होत नाही अशी माहिती गडकरी यांनी दिली.  (nitin gadkari to decission flex fuel engine in cars)

ग्रीन हायड्रोजनचा वापर

फ्लेक्स इंधन इंजिन  असलेल्या गाड्यांमध्ये अनेक प्रकारचे इंधन वापरता येतं. गडकरी म्हणाले की, येत्या १५-२० दिवसांत माझ्याकडे एक खास गाडी येणार आहे, त्यात ग्रीन हायड्रोजनचा वापर होणार आहे. पाण्यातून ऑक्सिजन आणि हायड्रोजन काढल्यावर हे ग्रीन हायड्रोजन तयार होतं. अशा प्रकारच्या इंधनावर गाडी चालते यावर लोकांचा विश्वासच बसत नाही, ज्या दिवशी ही गाडी मी रस्त्यावर घेऊन येईन तेव्हा लोकांचा यावर विश्वास बसेल असे गडकारी म्हणाले.   

ग्रीन हायड्रोजनवर देशात कार, बाईक्स आणि ट्रक्स धावतील

नगर पालिका आणि महानगरपालिकांच्या वाया गेलेल्या पाण्यातून ग्रीन हायड्रोजन (Green Hydrogen) बनवले जाईल. याच ग्रीन हायड्रोजनवर देशात कार, बाईक्स आणि ट्रक्स धावतील असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.   


एका कार्यक्रमात गडकरी म्हणाल की की भारतात दर वर्षी आठ लाख कोटी रुपयांचे पेट्रोलियम उत्पादन (petroleum Products) आयात होता. जर भारत इंधनासाठी अशाच प्रकारे इतर देशांवर अबलंबून राहणार असेल तर पुढील पाच वर्षात हा आकडा २५ लाख कोटी रुपयांच्या घरात जाईल असा अंदाज गडकरी यांनी व्यक्त केला.  

पुढील दोन तीन दिवसांत मी एक आदेश काढणार असून त्यामुळे भारताचे इतर देशावरील इंधानाचे अवलंबित्व कमी होईल असे गडकरी म्हणाले. या आदेशानुसार गाड्या बनवणार्‍या कंपन्यांना फ्लेक्स इंधन लावणे अनिवार्य होईल. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, सुजुकी, ह्युंदाई मोटरच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आपल्या गाड्यांमध्ये फ्लेक्स  इंधन लावण्याचे आश्वासन दिल्याचेही गडकरी यांनी नमूद केले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी