'नितीश कुमार ऑफिसमध्येच गांजा मारतात, त्याशिवाय विधानसभेत जातच नाही', कोणी केला धक्कादायक आरोप

CM Nitish Kumar: पाचवेळा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या भाजप आमदाराने एक अतिशय खळबळजनक विधान केलं आहे. ज्यामुळे बिहारच्या राजकारणात वादाला तोंड फुटलं आहे.

nitish kumar does not go to assembly without somking ganja bjp mla alleges
'नितीश कुमार ऑफिसमध्येच गांजा मारतात, त्याशिवाय विधानसभेत जातच नाही', कोणी केला धक्कादायक आरोप 
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या भागीरथी देवी या पश्चिम चंपारणच्या रामनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात
  • नरकटियागंजच्या ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये त्या कधी काळी झाडू मारण्याचं काम करायच्या.
  • भाजप आमदाराचे भागीरथी देवींच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल

Bihar: पटना: बिहारमधील (Bihar) पश्चिम चंपारणमधील रामनगर येथील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदार भागीरथी देवी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांच्यावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक असे आरोप केले आहेत. नितीश कुमार यांच्याकडे चांदीची चिलम आहे आणि चिलम ओढल्याशिवाय ते विधानसभेत जातच नाहीत. एवढंच नाही तर ते ऑफिसमध्ये बसल्या-बसल्या तिथेच गांजा मारतात. असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. (nitish kumar does not go to assembly without somking ganja bjp mla alleges)

भागीरथी देवी यांच्या या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 50 सेकंदांच्या क्लिपमध्ये त्या म्हणत आहेत की, 'नितीश कुमारांच्या डोळ्यात धूर आणि हातात चिलम कायम असते. ते चिलमबद्दलच बोलतात. त्यांचा सगळा कारभार चिलमवरच सुरु असतो. जोपर्यंत ते चिलम ओढत नाहीत तोपर्यंत विधानसभेत काही येत नाही.'

अधिक वाचा: NDA पासून Nitish Kumar वेगळे होण्यामागचे मोठे कारण काय?, Prashant Kishor यांनी दिले हे उत्तर

भागीरथी देव पुढे असंही म्हणाल्या की, 'नितीश कुमार विधानसभेतून उठून लॉबीत जातात. ऑफिसमध्ये ते गांजा ओढतात. मग ते पुन्हा सदनात येऊन बसतात. ते गांजा पिऊनच बोलतात. चिलम त्यांच्या हातातच असते. त्याच्याकडे चांदीचा चिलम आहे. त्यांची अवस्था काय असते ते आम्हाला माहीत आहे. त्यांचे कायदे, विचार, मूल्ये काय आहेत... त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.'

अधिक वाचा: '2014चे हिरो 2024 मध्येही विजेते होतील?', शपथ घेताच नितीश कुमारांचा मोदींना बोचरा सवाल

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या तसेच पाचवेळा भाजप आमदार असलेल्या भागीरथी देवी यांनी केलेलं हे वक्तव्य खूपच भयंकर असून सर्वांमध्ये खळबळ उडवून देणारं आहे. त्यांचे असे आरोप ऐकून त्या जिथे बोलत होत्या तेथील उपस्थित देखील त्यांचे हसू लपवू शकले नव्हते.

विशेष म्हणजे, ६८ वर्षीय देवी या राज्यातील नरकटियागंज येथील ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसमध्ये साफसफाईचे काम करत होत्या. तेव्हा त्यांना 800 रुपये पगार मिळत असे. पण परिस्थिती अशी काही बदलली की, त्या अचानक थेट आमदार म्हणून विधानसभेत पोहचल्या.

भाजप आमदार भागीरथी देवी

नितीश कुमारांनी भाजपला पाठवलं विरोधी बाकांवर

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपला जोरदार हादरा दिला. साधारण चार वर्षापासून असलेली युती भाजप-जनता दल (युनायटेड) नितीश कुमार यांनी तोडून टाकली. ज्यामुळे बिहारमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला थेट विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. नितीश कुमार यांनी ९ ऑगस्टला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि दुसऱ्याच दिवशी राजदच्या साथीने त्यांनी नवं सरकार स्थापन केलं होतं. 

अधिक वाचा: २०२४ मध्ये पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींसमोर नितीश कुमार यांचं आव्हान? पाहा VIDEO

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सुपूर्द केले होते. ज्याच्या दुसऱ्याच दिवशी नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

अधिक वाचा: Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; भाजपला हादरवलं

तेव्हापासूनच भाजपकडून नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत आहे. भाजपचे जास्त आमदार निवडून आलेले असताना देखील नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं मात्र, त्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप भाजप नेत्यांकडून नितीश कुमारांवर केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी