कुतुबमिनार का विष्णू स्तंभ: कुतुबमिनारच्या परिसरात कोणतेच होणार नाही उत्खनन- केंद्रीय सांस्कृतिक मंत्री

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री (Union Cultural Minister) जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी माध्यमांच्या वृत्ताचे खंडन केले असून कुतुबमिनारच्या (Qutub Minar) उत्खननाबाबत (excavation) अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कुतुबमिनार संकुलात पुरातत्व सर्वेक्षण (ASI) (Archaeological survey) कडून कोणतेही उत्खनन केले जाणार नाही.

No excavation will take place in the vicinity of Qutub Minar
कुतुबमिनारच्या परिसरात कोणतेच होणार नाही उत्खनन  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • कुतुबमिनार संकुलातील पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी 24 मे रोजी होणार
  • कुतुबमिनार संकुलात पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून कोणतेही उत्खनन केले जाणार नाही.
  • कुतुबमिनार येथे असलेली कुव्वत-उल-इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची 27 मंदिरे पाडून बांधण्यात आल्याचा दावा

नवी दिल्ली :  केंद्रीय सांस्कृतिक मंत्री (Union Cultural Minister) जी. किशन रेड्डी (G. Kishan Reddy) यांनी माध्यमांच्या वृत्ताचे खंडन केले असून कुतुबमिनारच्या (Qutub Minar) उत्खननाबाबत (excavation) अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, कुतुबमिनार संकुलात पुरातत्व सर्वेक्षण (ASI) (Archaeological survey) कडून कोणतेही उत्खनन केले जाणार नाही. आतापर्यंत आम्ही याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

दरम्यान, यापूर्वी बातमी आली होती की, कुतुबमिनारजवळ असलेल्या मशिदीपासून 15 मीटर अंतरावर उत्खनन केले जाऊ शकते. मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. त्यांनी एका पथकासह कुतुबमिनार परिसराचीही पाहणी देखील केली.  दरम्यान, कुतुबमिनारमध्ये शेवटचे उत्खनन 1991 मध्ये झाले होते. सांस्कृतिक मंत्रालयाच्या आदेशानुसार कुतुबमिनारमध्ये मूर्तींची आयकॉनोग्राफी केली जाईल, असा दावा रविवारी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. मात्र, आता केंद्रीय मंत्र्यांनी हे दावे साफ फेटाळून लावले आहेत. 

परिसरात पूजेसाठी दाखल आहे याचिका

17 मे रोजी, दिल्लीच्या साकेत न्यायालयात, कुतुबमिनार परिसरात पूजेची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या याचिकेवर 24 मे रोजी सुनावणी होणार आहे. संयुक्त हिंदू आघाडीने २०२२ मध्ये याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले होते की, कुतुबमिनार येथे असलेली कुव्वत-उल-इस्लाम मशीद हिंदू आणि जैन धर्माची २७ मंदिरे पाडून बांधण्यात आली होती. अशा स्थितीत तेथे पुन्हा मूर्ती स्थापन करून पूजेला परवानगी द्यावी.

ASIच्या माजी प्रादेशिक संचालकांनी दावा केला होता

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत माजी ASI प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी दावा केला आहे की कुतुबमिनार कुतुबुद्दीन ऐबकने बांधला नव्हता. याबाबत त्यांनी 3 मोठे दावे केले होते.
माजी ASI अधिकाऱ्याचे 3 मोठे दावे...

1. कुतुबमिनार नाही, सन टॉवर आहे

'हा सन टॉवर आहे, कुतुबमिनार नाही. या संदर्भात माझ्याकडे बरेच पुरावे आहेत.' एएसआयच्या वतीने शर्मा यांनी कुतुबमिनारचे अनेकवेळा सर्वेक्षण केले आहे.

2. मिनारच्या बुरुजाला 25 इंचाचा कल आहे

ते म्हणाले, 'कुतुबमिनारचा बुरुज 25 इंच झुकलेला आहे, कारण येथून सूर्याचा अभ्यास केला जात होता. त्यामुळेच २१ जूनला सूर्य आकाशात जागा बदलत होता, तेव्हाही अर्धा तास त्या ठिकाणी कुतुबमिनारची सावली पडली नव्हती. हे विज्ञान तसेच पुरातत्वीय पुरावाही आहे.'

3. रात्री ध्रुव तारा पाहिला जात होता

शर्मा यांनी सांगितले की, लोकांचा दावा आहे की कुतुबमिनार ही एक स्वतंत्र इमारत आहे आणि ती जवळच्या मशिदीशी संबंधित नाही. वास्तविक, त्याचे दरवाजे उत्तराभिमुख आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी ध्रुव तारा दिसू शकतो.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी